मुंबई

निवडणुकीनंतर एकही बेकायदा होर्डिंग नको; न्यायालयाला हलक्यात घेऊ नका! राज्य सरकार, पालिकांना हायकोर्टाची तंबी

बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई करण्याच्या आदेशानंतरही कारवाई करण्यास अपयशी ठरलेल्या राज्य सरकार आणि महापालिकांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयाने त्यांना चांगलेच धारेवर धरले. निवडणुका झाल्यावर एकही होर्डिंग्ज राहणार नाही याची दक्षता घ्या. नव्याने बेकायदेशीर होर्डिंग्ज उभारली जाणार नाही, याची दक्षता घ्या.

Swapnil S

मुंबई : बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई करण्याच्या आदेशानंतरही कारवाई करण्यास अपयशी ठरलेल्या राज्य सरकार आणि महापालिकांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयाने त्यांना चांगलेच धारेवर धरले. निवडणुका झाल्यावर एकही होर्डिंग्ज राहणार नाही याची दक्षता घ्या. नव्याने बेकायदेशीर होर्डिंग्ज उभारली जाणार नाही, याची दक्षता घ्या. त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करा, असा आदेश दिला. तसेच न्यायालयाला हलक्यात घेऊ नका अन्यथा गंभीर परणामाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देत याचिकेची सुनावणी १८ डिसेंबरपर्यंत तहकूब ठेवली.

बेकायदेशीर बॅनर, होर्डिंग्ज आणि पोस्टर्सच्या मुद्द्यावर दाखल केलेल्या जनहित याचिकांवर सहा वर्षांपूर्वी जानेवारी २०१७ मध्ये सुनावणी झाल्यानंतर न्या. अभय ओक आणि न्या. ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठाने निर्णय देताना बेकायदा होर्डिंग, बॅनरविरोधात कारवाई करावी, नागरिकांना तक्रार करता यावी यासाठी यंत्रणा निर्माण करावी, याबाबत सविस्तर आदेश दिलेत. असे असतानाही गेल्या सहा वर्षांत या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने हायकोर्टाने स्वतःहून अवमान याचिका दाखल करून घेतली आहे.

बेकायदा होर्डिंग्जमुळे शहरांचे विद्रुपीकरण झाल्याचा मुद्द्यावर साताऱ्यातील सुस्वराज फाऊंडेशन तसेच अन्य याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. उदय वारुंजीकर, अ‍ॅड. मनोज कोंडेकर, अ‍ॅड. मनोज शिरसाट यांच्यामार्फत जनहित याचिका केल्या आहेत. या याचिकांवर सोमवारी मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठा समोर एकत्रित सुनावणी झाली.

राज्यात ६० टक्के मतदान; सर्वाधिक ६९.२२ टक्के मतदान गडचिरोलीत

सिंहासनासाठी काँटे की टक्कर! ‘एक्झिट पोल’च्या आकड्यांमध्ये संमिश्र कौल

सुसंस्कृत महाराष्ट्रातही मतदानादरम्यान हिंसक घटना

चार राज्यांतील पोटनिवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

मुंबईत मतदारांमध्ये निरूत्साह! केवळ ५१.४१ टक्के मतदान; अनेक मतदारांची मतदानाकडे पाठ