मुंबई

धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये नकोच, मुलुंडकरांचा विरोध, आज आंदोलन

धारावीचा पुनर्विकास व्हावा पण धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये नको, अशी भूमिका मुलुंड करांनी घेतली आहे.

Swapnil S

मुंबई : धारावीचा पुनर्विकास व्हावा पण धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये नको, अशी भूमिका मुलुंड करांनी घेतली आहे. मुलुंडमध्ये पुनर्वसनाला विरोध करण्यासाठी रविवारी आंदोलन करण्याचा निर्णय मुलुंडकरांनी घेतला आहे; मात्र मुलुंडकरांच्या आंदोलनावर आक्षेप घेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे सांगत आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत.

अपात्र असलेल्या धाराविकारांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणावर मुलुंड परिसरात घरे बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी मिठागरांची जमीन अधिग्रहण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लाखो धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये झाल्यास नागरीसेवांवर याचा ताण पडणार आहे. या आधीच मुलुंडमध्ये वाहतूककोंडीची गंभीर समस्या असून, आरोग्याशी निगडित सुविधांवरही याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच करण्यात यावे, अशी मागणी वारंवार केली जात आहे; मात्र मुलुंडकरांना ग्राह्य न धरता या ठिकाणी धारावीकरांचे पुनर्वसन याच ठिकाणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

आंदोलनकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा

दरम्यान, ॲड. सागर देवरे यांच्या प्रयास संस्था आणि शिवसेनेच्या वतीने मराठा मंडळ गेट, मुलुंड पूर्व या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, घडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. यासाठी ॲड. सागर देवरे यांना नवघर पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार

NPS आता अधिक आकर्षक; आजपासून १०० टक्के समभागात गुंतवणुकीची परवानगी