मुंबई

उत्तर भारतीय मोर्चाचे सरचिटणीस राम यादव शिंदे गटात

श्री रामचा जयघोष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवास येथे राम यांचे जंगी स्वागत केले.

प्रतिनिधी

मुंबई महापालिकेत कमळ फुलवण्याचा दावा करणाऱ्या भाजपला पहिला धक्का दहिसर विधानसभा मतदारसंघातून बसला आहे. मुंबई भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे सरचिटणीस राम यादव यांनी शेकडो समर्थकांसह शिंदे सेनेत प्रवेश केला. भाजपला जय श्री रामचा जयघोष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवास येथे राम यांचे जंगी स्वागत केले.

दहिसर येथे सायंकाळी आयोजित कार्यक्रमात शिंदे सेनेचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो राम समर्थकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. राम यादव हे भाजपमध्ये ओबीसी समाजाचे म्हणून ओळखले जातात. ते गेल्या १५ वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय होते. २०१७च्या पालिका निवडणुकीत भाजपने राम यादव यांना तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांच्या विरोधामुळे राम यांचे तिकीट कापण्यात आल्याचे बोलले जाते.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री