PM
मुंबई

BMC मध्ये जुनी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बंद होणार; १ जानेवारीपासून कर्मचाऱ्यांसाठी फेशियल बायोमेट्रिक हजेरी

येत्या १ जानेवारीपासून मुंबई महापालिकेमध्ये जुनी बायोमेट्रिक हजेरी पद्धत बंद होणार आहे. या ऐवजी पालिकेच्या सर्व विभागांची कार्यालयीन उपस्थिती लिनक्स आधारित फेशियल बायोमेट्रिक हजेरी प्रणालीद्वारे होणार आहे. आतापर्यंत ९० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी फेशियल बायोमेट्रिक मशीनवर हजेरीची नोंद केली आहे.

Swapnil S

मुंबई : येत्या १ जानेवारीपासून मुंबई महापालिकेमध्ये जुनी बायोमेट्रिक हजेरी पद्धत बंद होणार आहे. या ऐवजी पालिकेच्या सर्व विभागांची कार्यालयीन उपस्थिती लिनक्स आधारित फेशियल बायोमेट्रिक हजेरी प्रणालीद्वारे होणार आहे. आतापर्यंत ९० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी फेशियल बायोमेट्रिक मशीनवर हजेरीची नोंद केली आहे. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत याबाबतची नोंदणी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास आणि फेशियल बायोमेट्रिक हजेरी न नोंदवल्यास येत्या जानेवारीपासून कर्मचाऱ्यांचे पगार कापले जाणार आहेत. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांनी फेशियल बायोमेट्रिक मशीनवर नोंदणी करून आतापासूनच हजेरी नोंदवली नसेल त्यांनी त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन पालिकेने कर्मचाऱ्यांना केले आहे.

मुंबई महापालिकेच्या सर्व विभागांची कार्यालयीन उपस्थिती लिनक्स आधारित फेशियल बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदविणे तसेच सध्याच्या हजेरी संगणक प्रणालीत सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. नवीन फेशियल बायोमेट्रिक हजेरी प्रणालीचा वापर करण्याच्या उद्दिष्टामुळे प्रायोगिक तत्त्वावर १५० मशिन्स पालिकेकडून घेण्यात आल्या आहेत. या फेशियल प्रणालीचा वापर केल्यास कोणत्याही दिवसाच्या उपस्थितीसाठी प्रथम नोंदित वेळ व अंतिम नोंदित वेळ ग्राह्य धरण्यात येणार आहे. सुमारे १०० कर्मचाऱ्यांकरिता एक याप्रमाणे फेशियल बायोमेट्रिक मशिन खरेदी करण्यात येत असून त्यानुसार आतापर्यंत विविध कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार मशिन्स बसवण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून जुनी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बंद करण्यात येणार आहे. आतापर्यंत फेशिअल बायोमेट्रिक हजेरी प्रणालीच्या वापराकरिता महापालिकेच्या विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांपैकी ९० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली नाही त्यांनी लवकरच यावर नोंदणी करून घ्यावी. अन्यथा पगाराची रक्कम कापली जाणार आहे.

...यामुळे नवीन हजेरी प्रणालीचा वापर

सद्यस्थितीत महापालिकेतील कर्मचाऱ्यांची हाताच्या बोटांच्या ठशांद्वारे उपस्थिती नोंदवली जाते. परंतु पालिकेतील काही कर्मचारी मेणाच्या अंगठ्याचा वापर करून बोगस उपस्थिती नोंदवण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. पालिकेतील हा गैरप्रकार कायमचा बंद करण्यासाठी प्रशासनाने बायोमेट्रिक फेशियल हजेरी प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव