मुंबई

मध्य रेल्वे मार्गावर लोखंडी ड्रम रुळावर टाकून अपघात घडवण्याचा प्रयत्न ; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

देवांग भागवत

सँडहर्स्ट रोड ते भायखळा या रेल्वे स्थानकांदरम्यान दगडाने भरलेला लोखंडी ड्रम १ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास ठेवण्यात आला होता. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे तात्काळ ट्रेनला ब्रेक लावण्यात आल्याने मोठा अपघात टळला. दरम्यान, हा ड्रम रुळावर कसा आला? याचा तपास आता रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मध्य रेल्वे मार्गावर लोखंडी ड्रम रुळावर टाकून अपघात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला असून या घटनेत खोपोली लोकलमधील प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला आहे.रेल्वे अधिकाऱ्यांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर लोकलमधील प्रवाशांच्या मदतीने हा ड्रम रुळावरून हटवण्यात आला. या घटनेमुळे ही लोकल पाच मिनिटे उशिरा कल्याण स्थानकात पोहोचली.


घटना काय?

सीएसएमटी स्थानकातून केपी-७ ही जलद लोकल खोपोलीच्या दिशेने १ सप्टेंबरला दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी निघाली होती. या प्रवासादरम्यान मोटरमन अशोक शर्मा यांना भायखळा रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर एक लोखंडी ड्रम आढळून आला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत शर्मा यांनी वेळीच आपत्कालीन ब्रेक दाबले. मात्र, तरीही या लोकलने लोखंडी ड्रमला जोरदार धडक दिली. त्यानंतर काही अंतरावर ही ट्रेन थांबली. या घटनेदरम्यान परिसरात कर्नकर्कश आवाज झाला होता.

"अमेठी आणि रायबरेली दोन्ही माझं कुटूंब..." उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधींची भावनिक पोस्ट

संजय निरूपम यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?