मुंबई

गोखले पुलाची एक लेन आजपासून खुली; पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांची माहिती

Swapnil S

मुंबई : अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची एक लेन वाहतुकीसाठी सोमवारी संध्याकाळपासून खुली करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी दिली. दरम्यान, मुंबई शहरचे पालक मंत्री दीपक केसरकर व उपनगरचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता एक लेनचे उद्घाटन होणार असल्याचे समजते.

अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल धोकादायक झाल्याने नोव्हेंबर २०२२ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. गोखले पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने अंधेरी पूर्व व पश्चिमेसह वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण झाली. गोखले पुलाचे काम जलदगतीने करावे, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी लावून धरली. परंतु रेल्वे हद्दीतील पुलाचे काम कोण करणार, यावर वाद निर्माण झाला आणि मुंबई उपनगरचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लक्ष घालत, पश्चिम रेल्वे व मुंबई महापालिकेच्या पूल विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर पुलाचे काम पालिका करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर पालिकेने २ डिसेंबर २०२३ रोजी पहिला गर्डर लाँच केला. तसेच पुलाजवळील पोच रस्त्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे एप्रिल २०२३ मध्ये पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र पुलासाठी लागणारे गर्डर पंजाब येथील अंबालामधील कंपनीत तयार करण्यास उशीर झाल्याने पुढील कामे रखडली.

हा पूल चार लेनचा असून पश्चिम द्रुतगती महामार्ग अंधेरी पूर्व ते एसव्ही रोड अंधेरी पश्चिम असा जोडतो. तसेच तेली गल्लीला कनेक्टर आहे. पुलाचा दुसरा भाग डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणार असल्याने संपूर्ण पूल डिसेंबरनंतर वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

विभवकुमारने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण; स्वाती मालीवाल यांनी नोंदविला 'एफआयआर'

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

छगन भुजबळ नाराज; प्रचारात फारसे सक्रिय नसल्याने चर्चांना उधाण

सिंचन घोटाळ्यात तथ्य, मात्र अजितदादा दोषी नाहीत - फडणवीस