मुंबई

बाप्पाच्या विसर्जनासाठी ऑनलाइन नोंदणी सुरु ; कोरोना आणि गर्दीचा धोका टाळण्यासाठी पालिका सावध

लाडक्या गणरायाच्या आगमनाला फक्त १० दिवस शिल्लक असून बाप्पाच्या स्वागतासाठी गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे

प्रतिनिधी

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा पुन्हा एकदा झपाट्याने प्रसार होत असून, बाप्पाच्या विसर्जनासाठी गणेशभक्तांची गर्दी लक्षात घेता गणेशमूर्ती विसर्जनासाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जनासाठी ऑनलाइन अर्ज केल्यास संभाव्य धोका टाळणे शक्य होणार असून, गणेशमूर्तींचे विसर्जनही योग्य रीतीने होईल, असा विश्वास पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

लाडक्या गणरायाच्या आगमनाला फक्त १० दिवस शिल्लक असून बाप्पाच्या स्वागतासाठी गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. देशभरात गणेशोत्सव साजरा होत असला, तरी मुंबईत गणपती उत्सवाची वेगळीच मजा असते; मात्र कोरोनाचे संकट लक्षात घेता यंदा गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी ऑनलाइन नोंदणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. https/ shreeganeshvisarjan.com या लिंकवर घरगुती गणपती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्वतंत्र नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत मुंबई महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयात नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्थळाची नावे उपलब्ध आहेत. विसर्जन स्थळाची नावे आपल्या घराजवळ किंवा गणेशोत्सव मंडळाजवळ असेल त्या विसर्जन स्थळाची निवड करत विसर्जनाची तारीख व वेळ निश्चित करावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने गणेशभक्तांना केले आहे.

मतदारच डिलीट केले! राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर आरोप

मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; आठवड्याभरात दुसरी घटना, पोलिसांकडून अलर्ट जारी

मालेगाव बॉम्बस्फोटातील निर्दोष सुटलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस

मराठा समाजाला मोठा दिलासा! हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली

...म्हणून मला मोदींना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! पंच्याहत्तरीनंतरही सक्रिय असलेल्या शरद पवारांचे वक्तव्य