मुंबई

तरच शिवसेना फुटणार नाही, एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सूचक इशारा

एकनाथ शिंदे हे आग्रही असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी त्यांचे फोनवरुन बोलणे झाल्यानंतर स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले

प्रतिनिधी

भाजपशी युती करण्याबाबत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आग्रही असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी त्यांचे फोनवरुन बोलणे झाल्यानंतर स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुंबईत येऊन भेटण्यास सांगितले आहे; पण शिंदे यांनी भाजपसोबत युतीची अट ठेवली असून याबाबत प्रथम आपली भूमिका स्पष्ट करा, असा आग्रह धरला आहे. तसेच भाजपसोबत युती झाली तर शिवसेना फुटणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे. शिंदे यांनी ३५ आमदारांसह सुरत गाठले असून त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी अट शिष्टाई करण्यासाठी सुरतला गेलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना घातली आहे. त्यामुळे मविआ सरकारला मोठा हादरा बसला आहे.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण