मुंबई महापालिकेतही ‘ऑपरेशन टायगर’? ठाकरे सेनेचे २० ते २५ नगरसेवक संपर्कात; BMCतील गटनेते अमेय घोले यांचा दावा 
मुंबई

मुंबई महापालिकेतही ‘ऑपरेशन टायगर’? ठाकरे सेनेचे २० ते २५ नगरसेवक संपर्कात; BMCतील गटनेते अमेय घोले यांचा दावा

ठाकरे सेनेचे खासदार फुटल्याचे पडसाद आता मुंबई महापालिकेतही उमटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Swapnil S

मुंबई : ठाकरे सेनेचे खासदार फुटल्याचे पडसाद आता मुंबई महापालिकेतही उमटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ठाकरे सेनेचे २० ते २५ नगरसेवक आमच्या संपर्कात असून पुढील अर्थसंकल्प सादर होण्याआधी ४५ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावा मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी केला आहे. दरम्यान, ऑपरेशन टायगर हे ‘ऑपरेशन लोटस’शिवाय अशक्य आहे, असा चिमटा सभागृह नेते गणेश खणकर यांनी शिंदे सेनेला काढला.

ठाकरे सेनेचे खासदार फुटले असून त्यांचा वेगळा गट लवकरच शिंदे सेनेत विलीन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतील ठाकरे सेनेचे नगरसेवक शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू होती. त्यात अमेय घोले यांनी २० ते २५ नगरसेवक संपर्कात असून लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असा दावा घोले यांनी केला आहे.

ठाकरे सेनेतील अंतर्गत नाराजी आणि गळती थांबण्याचे नाव घेत नाही. खासदार आणि आमदारांनंतर आता ठाकरे गटातील नगरसेवकांमध्येही प्रचंड अस्वस्थता असून, आगामी काळात पक्षात मोठी फूट पडणार असल्याचा खळबळजनक दावा युवासेना नेते अमेय घोले यांनी केला आहे. विशेष म्हणजे, सातारा जिल्ह्यातील ठाकरे गटाचे २० ते २५ नगरसेवक सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते लवकरच मोठा निर्णय घेतील, असे सांगत घोले यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

नेतृत्वाकडून भेटण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नसल्याने नाराजी

ठाकरे गटात सध्या लोकप्रतिनिधींची गळचेपी होत आहे. पक्षातील खासदार आणि आमदारांना नेतृत्वाकडून भेटण्यासाठी पुरेसा वेळ आणि महत्त्व दिले जात नाही. याच मुख्य कारणास्तव लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड नाराजी असून पक्षांतर्गत अस्वस्थता शिगेला पोहोचली आहे, असे घोले यांनी स्पष्ट केले.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली