मुंबई

पालिकेला नव्याने मॅरेज सर्टिफिकेट देण्याचे आदेश; दाम्पत्याला हायकोर्टाचा दिलासा

लग्नाची तारीख हुकली आणि सहा महिन्यांनंतर विवाह झाला. मात्र मॅरेज सर्टिफिकेटवर लग्नपत्रिकेवरील तारखेची नोंद झाली. या तारखेच्या घोळाने मनस्ताप झालेल्या दाम्पत्याला अखेर हायकोर्टाची पायरी चढावी लागली.

Swapnil S

मुंबई : लग्नाची तारीख हुकली आणि सहा महिन्यांनंतर विवाह झाला. मात्र मॅरेज सर्टिफिकेटवर लग्नपत्रिकेवरील तारखेची नोंद झाली. या तारखेच्या घोळाने मनस्ताप झालेल्या दाम्पत्याला अखेर हायकोर्टाची पायरी चढावी लागली. न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला व न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने दाम्पत्याना दिलासा देत मॅरेज सर्टिफिकेटवर नव्याने तारीख नमूद करण्याची मुभा दिली. महापालिकेला तशी दुरुस्ती करून नव्याने मॅरेज सर्टिफिकेट देण्याचे आदेश दिले.

पुण्याचे रहिवाशी, मात्र नोकरीनिमित्त परदेशी असलेल्या वधूने पुण्याच्या मुलाशी २३ मे २०२३ रोजी पुणे येथे विवाह निश्चित केला. लग्न पत्रिकाही छापल्या. मात्र त्या दिवशी वधू पुण्याला पोहचलीच नाही. त्यामुळे विवाह पुढे ढकलण्यात आला. ५ नोव्हेंबर २०२३रोजी वधू भारतात आली. आणि ६ नोव्हेंबरला बोहल्यावर चढली. रीतीरिवाजाप्रमाणे विवाह झाला. त्यानंतर वधू तातडीने परदेशात गेली.

दरम्यान, मॅरेज सर्टिफिकेटसाठी त्यांनी रितसर पालिकेकडे अर्ज केला. पालिकेकडून त्यांना मॅरेज सर्टिफिकेटही मिळाले. परंतु परदेशी शिक्षण घेण्यासाठी वराने व्हिसासाठी अर्ज केला तेव्हा मात्र मॅरेज सर्टिफिकेट मध्ये चुकीची तारीख असल्याने व्हिसा मिळण्यास अडचणी येऊ लागल्या. त्यांनी तातडीने पालिकेशी संपर्क साधला. मात्र पालिकेने तारीख बदलून देण्यास नकार दिला. अखेर दाम्पत्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली.

या याचिकेवर न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला व न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव