हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू

'अग्निवीर' भरती प्रक्रियेचा वापर भारतात हेरगिरीसाठी भावी 'एजंट' बनवण्यासाठी पाकिस्तान स्थित गुप्तचर यंत्रणांच्या हालचाली सुरू असल्याचे भयानक कटकारस्थान समोर आले आहे.

प्रतिनिधी

मुंबई: 'अग्निवीर' भरती प्रक्रियेचा वापर भारतात हेरगिरीसाठी भावी 'एजंट' बनवण्यासाठी पाकिस्तान स्थित गुप्तचर यंत्रणांच्या हालचाली सुरू असल्याचे भयानक कटकारस्थान समोर आले आहे.

सैन्यात दाखल होण्यापूर्वीच भावी हेरगिरीसाठी लागणारे 'गुणवान' उमेदवार शोधण्याचे व्यासपीठ म्हणून अग्निवीर भरती प्रक्रियेवर पाकने लक्ष केंद्रित केल्याचे भारतीय तपास अधिकाऱ्यांना आढळले आहे. महाराष्ट्र, पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि दिल्ली येथील 'अग्निवीर' उमेदवारांना प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी संस्था आणि प्रशिक्षकांच्या भूमिकेची तपास यंत्रणांकडून छाननी केली जात आहे. या संस्था आणि प्रशिक्षक कथित आर्थिक लाभाच्या बदल्यात, पाकिस्तान स्थित गुप्तचर हस्तकांसाठी काम करणाऱ्या मध्यस्थांना उमेदवारांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली. तसेच काही प्रकरणांमध्ये उमेदवारांची पार्श्वभूमी, आर्थिक स्थिती, आवडीनिवडी आणि वैयक्तिक कमकुवत दुवे आदी माहिती त्या मध्यस्थांना पुरवली.

तपास यंत्रणांकडे आलेल्या गुप्त माहितीनुसार, ही संशयास्पद मोहीम भरतीपूर्व टण्यावरच सुरू झाल्याचे दिसते. यात पाकिस्तान-स्थित सूत्रधार आणि त्यांच्या स्थानिक हस्तकांनी खाजगी प्रशिक्षण संस्था व प्रशिक्षकांच्या मदतीने संभाव्य उमेदवारांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून संरक्षण दलात दाखल होण्यापूर्वीच त्यांच्याशी संपर्क साधता येईल. लष्करी सेवेत अधिकृतपणे दाखल झाल्यानंतर जवानांना हेरगिरीसाठी प्रवृत्त करणे किंवा फितवणे यात जोखीम असते; त्याऐवजी निवडलेल्या उमेदवारांना दीर्घकाळापर्यंत हाताळून तयार करणे, ही यामागची कथित रणनीती होती.

काही प्रकरणांमध्ये, या हस्तकांनी बनावट सोशल मीडिया प्रोफाइल्स तयार केली होती; यात 'अग्निवीर' उमेदवारांमध्ये रोमँटिक किंवा लैंगिक स्वारस्य दाखवणाऱ्या तरुणींची बनावट प्रोफाइल्सही समाविष्ट होती. त्यानंतर, हे हेर संबंधित उमेदवारांचा विश्वास अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करत. त्यांचे प्रशिक्षण, लष्करी वातावरण आणि नेमणुकीच्या ठिकाणांची माहिती मिळवत असत. अशा प्रकारे निर्माण झालेली माहिती आणि भावनिक बंधांचा वापर करून संबंधित उमेदवारांवर प्रभाव पाडला जात असे आणि अखेरीस त्यांना हेरगिरीच्या कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले जात असे. संबंधित यंत्रणांच्या मते, या हेरगिरीच्या कारवायांमध्ये कोचिंग संस्थांची भूमिका महत्त्वाची असते.

ब्लॅकमेलिंगची भीती

तपासकर्त्यांचा असा संशय आहे की, काही उमेदवारांनी सुरुवातीला गुप्त माहिती गोळा करण्यामागचा मूळ उद्देश न ओळखताच अशी माहिती दिली असावी. मात्र, जेव्हा त्या उमेदवारांना यामागील हेतू समजला, तोपर्यंत हे संबंध अशा टप्प्यावर पोहोचलेले असत की त्यातून बाहेर पडणे किंवा माहिती देणे थांबवणे जवळजवळ अशक्य होऊन बसत असे; याचे कारण ब्लॅकमेलिंग, उघडकीस येण्याची भीती किंवा इतर प्रकारचा दबाव हे असू शकत होते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

Mumbai : ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया होणार; सुक्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन शक्य

Mumbai : मिथेनचा 'निरी'कडून अभ्यास; कांजूर डम्पिंगवरील हवेच्या गुणवत्तेवर नजर, दुर्गंधी, प्रदूषण, आगीच्या हॉटस्पॉटचा शोध घेणार

सुभाष चंद्रा यांच्यावर CBI चा गुन्हा दाखल

गणपती सजावटीला 'चिनी' मालाचा झगमगाट; बाजारात स्वस्त साहित्याला पसंती, धारावी, भिवंडीच्या प्लास्टिक फुलांनाही मागणी