संग्रहित फोटो  
मुंबई

पासपोर्ट नूतनीकरणासाठी ‘क्लिअरन्स सर्टिफिकेट’ देण्याचा न्यायालयाचा आदेश

पाठलाग प्रकरणातील एका आरोपीला त्याचा पासपोर्ट नूतनीकरणासाठी क्लिअरन्स सर्टिफिकेट (स्वीकृती प्रमाणपत्र) देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शहर पोलीस आणि पासपोर्ट विभागाला दिले. शिक्षणासाठी कॅनडाला जाण्यासाठी आवश्यक क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळावे यासाठी या आरोपीने याचिका दाखल केली होती.

Swapnil S

मुंबई : पाठलाग प्रकरणातील एका आरोपीला त्याचा पासपोर्ट नूतनीकरणासाठी क्लिअरन्स सर्टिफिकेट (स्वीकृती प्रमाणपत्र) देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शहर पोलीस आणि पासपोर्ट विभागाला दिले. शिक्षणासाठी कॅनडाला जाण्यासाठी आवश्यक क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळावे यासाठी या आरोपीने याचिका दाखल केली होती.

न्या. जी. एस. कुलकर्णी आणि अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने मागील महिन्यात दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, कोर्टाने परदेश प्रवासास परवानगी दिली असताना पोलिसांनी क्लिअरन्स सर्टिफिकेट द्यायला हवे होते.

याचिकाकर्त्याने नमूद केले की, कनिष्ठ दंडाधिकारी न्यायालयाने त्याला पासपोर्ट नूतनीकरणासाठी परवानगी दिली आहे. तसेच एप्रिल २०२५ मध्ये उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने त्याला त्याच्या अभ्यासक्रमाच्या कालावधीत परदेश प्रवास करण्याची परवानगी दिली होती, असेही याचिकेत नमूद केले. न्यायालयाने आदेशात म्हटले की, नव्हेंबर २०२४ मध्ये पासपोर्ट नूतनीकरणास परवानगी देणारा आदेश मजिस्ट्रेट कोर्टाने दिला असताना, पोलिसांनी नकारात्मक अहवाल देणे योग्य नव्हते.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video