मुंबई

इमारतींवरील होर्डिंग्जवर कायमस्वरूपी बंदी; ओला, उबेर, बोटींना जाहिरातींसाठी पालिकेची परवानगी बंधनकारक

इमारतींवर मोठ मोठे जाहिरात फलक, होर्डिंग्ज यामुळे टेरेसवरून पाणी गळती, क्षमतेपेक्षा अधिक वजन यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इमारतींवर यापुढे होर्डिंग्ज, जाहिरात फलक लावण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : इमारतींवर मोठ मोठे जाहिरात फलक, होर्डिंग्ज यामुळे टेरेसवरून पाणी गळती, क्षमतेपेक्षा अधिक वजन यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इमारतींवर यापुढे होर्डिंग्ज, जाहिरात फलक लावण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात येणार आहे. तसेच चौपाट्यांवरील बोटी, ओला, उबेर टॅक्सीवर लावण्यात येणाऱ्या जाहिरातीसाठी आता पालिकेची परवानगी बंधनकारक असणार आहे.

घाटकोपर छेडा नगर येथील बेकायदा होर्डिंग्ज दुर्घटनेनंतर मुंबईतील बेकायदा होर्डिंग्जविरोधात पालिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मध्य व पश्चिम रेल्वे हद्दीत असलेले ३०६ होर्डिंग्ज हटवण्याची नोटीस पालिकेने बजावली; मात्र रेल्वे हद्दीतील फक्त १४ होर्डिंग्ज हटवण्यात आल्याने पालिकेने रेल्वेविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच जाहिरातीबाबत नवीन पाॅलिसी अंमलात आणण्यात येणार आहे. यासाठी कठोर नियमावली तयार केली आहे. विधान परिषद आणि पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका २६ जून रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ५ जुलैपर्यंत आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे आचारसंहितेचे निर्बंध रद्द केल्याने नवीन पाॅलिसीबाबत मुंबईकर आणि होर्डिंग्ज संघटनांकडून हरकती सूचना मागवण्यात येणार आहेत. काही हरकती सूचनांचा समावेश करत नवीन पाॅलिसी १ ऑगस्टपासून लागू करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, ओला, उबेर टॅक्सीवर जाहिरातीसाठी वाहतूक विभागाकडून परवानगी घेण्यात येते; मात्र यापुढे ओला, उबेर टॅक्सीवर जाहिरात झळकवण्यासाठी पालिकेची परवानगी बंधनकारक असणार आहे. गुरुवारी पालिका मुख्यालयात जाहिरात पाॅलिसीबाबत होर्डिंग्ज संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत नवीन धोरणावर चर्चा झाली असून नवीन धोरणात संघटनेच्या प्रतिनिधींच्या हरकती सूचनांचा समावेश करा, अशी मागणी केली असता पालिकेने हरकती सूचना पाठवण्याचे आवाहन केल्याचे होर्डिंग्ज संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.

डिजिटल होर्डिंग्ज झळकवण्याबाबत लवकरच निर्णय

मुंबईत रात्री ११ नंतर डिजिटल जाहिरात फलक निदर्शनास आल्यास संबंधित जाहिरात संस्थेविरोधात कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे; मात्र पालिकेच्या या निर्णयावर होर्डिंग्ज संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे डिजिटल होर्डिंग्ज रात्री ११ नंतर झळकावण्यास परवानगी द्यायची की नाही याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

ऑगस्ट मध्यापर्यंत नवीन धोरण अंमलात

नवीन पाॅलिसीत काय काय?

  • होर्डिंग्ज, जाहिरातीचे नवीन दर

  • जाहिरात होर्डिंग्जची साईज किती?

  • दोन होर्डिंग्जमधील अंतर किती?

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस