प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या १७६ संस्थांना नोटीस; PCI चे निकष बसवले धाब्यावर

भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेचे (पीसीआय) निकष धाब्यावर बसविणाऱ्या राज्यातील औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या तब्बल १७६ संस्थांना तंत्र शिक्षण संचालनालयाने नोटीस बजावली आहे.

Swapnil S

मुंबई : भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेचे (पीसीआय) निकष धाब्यावर बसविणाऱ्या राज्यातील औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या तब्बल १७६ संस्थांना तंत्र शिक्षण संचालनालयाने नोटीस बजावली आहे. या संस्थांनी निकषांची पूर्तता न केल्यास चालू शैक्षणिक वर्षांचे प्रथम वर्षाच्या प्रवेशाला परवानगी देण्यात येऊ नये, अशा निर्देश तंत्र शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.

राज्यात २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षांत परवानगी देण्यात आलेल्या राज्यातील संस्था भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेच्या निकषाप्रमाणे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतात काय याची तपासणी करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार करण्यात आलेल्या तपासणीमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या ९२ पैकी ४८ आणि पदविक अभ्यासक्रमाच्या २२० पैकी १२८ महाविद्यालये पात्रतेचे निकषच पूर्ण करत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. यामुळे या महाविद्यालयांना तंत्रशिक्षण संचालनालयाने ऑगस्ट महिन्यात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या निकषांची केली नाही पूर्तता

  • अग्निसुरक्षा प्रमाणपत्रच नसणे

  • भोगवटा प्रमाणपत्र नसणे

  • प्रयोगशाळांची संख्या कमी

  • पीसीआयच्या निकषांपेक्षा कमी कर्मचारी संख्या असणे.

Mumbai : पैशांपायी दमछाक, तरीही BEST घेणार १५०० मिडी बसेस; सात हजार कोटी खर्चाचा प्रस्ताव, बेस्ट समितीची मंजुरी

पाच वर्षांत ४४ हजार मेगावाॅट वीज खरेदीचे करार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

समान नागरी कायद्याची प्रक्रिया लवकरच; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती, नाशिकची ट्रिपल तलाक लक्षवेधी गाजली

वन्यजीव हल्ले, मृतांच्या नातेवाईकांना नोकरी; राज्यातील संघर्ष रोखण्यासाठी ‘रॅबिट फार्मिंग’ आणि हरिण संवर्धनावर भर

एसटी कर्मचाऱ्यांच्या ‘डीए’मध्ये ५ टक्के वाढ