मुंबई

नीरवच्या मेहुण्याचा जबाब नोंदवणार; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी कारवाईला वेग CBI ची बाजू भक्कम होण्याची शक्यता

पंजाब नॅशनल बँकेतील १३,००० कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालय येत्या सोमवारी फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या मेहुण्याचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे.

Swapnil S

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील १३,००० कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालय येत्या सोमवारी फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या मेहुण्याचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. नीरव मोदीचा मेहुणा मयांक मेहता हा हाँगकाँगस्थित ब्रिटिश नागरिक असून न्यायालयाने त्याला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मेहताने मोदीविरुद्ध साक्ष दिल्यास खटल्यात सीबीआयची बाजू भक्कम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सीबीआयने नीरव मोदीचा मेहुणा मेहताचा जबाब नोंदवण्याची विनंती विशेष सीबीआय न्यायालयाला केली.

तपास यंत्रणेची ही विनंती मान्य करीत न्यायालयाने तसे निर्देश दिले. त्यानुसार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ अंतर्गत मेहताचा जबाब नोंदवला जाणार आहे.

सीबीआयने अलीकडेच मयांक मेहता व त्याची पत्नी पूर्वी मोदीविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. जानेवारी २०२१ मध्ये ईडीने दाखल केलेल्या आर्थिक अफरातफरीच्या गुन्ह्यात मयांक व पूर्वी हे दोघेही नीरव मोदीविरुद्ध सरकारी साक्षीदार बनले होते. त्याची नोंद घेत न्यायालयाने त्यांना माफीचा साक्षीदार बनवले होते.

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी