मुंबई

पोक्सो कायद्यासंदर्भातील पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा आदेश अखेर रद्द

पूर्वीप्रमाणे एखादी तक्रार आल्यास पोलिसांना गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करावी लागणार आहे.

प्रतिनिधी

विनयभंगासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करताना प्रत्येक पोलीस ठाण्यांना पोलीस उपायुक्तांची परवानगी घेणारा माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा आदेश अखेर रद्द करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी हा आदेश रद्द केला आहे. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे एखादी तक्रार आल्यास पोलिसांना गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करावी लागणार आहे.

गेल्या काही दिवसांत जुन्या भांडणात, प्रॉपटी वाद आणि आर्थिक व्यवहारासह वैयक्तिक कारणावरून विविध पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो अंतर्गत दाखल होणार्‍या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास केल्यानंतर यातील बहुतांश गुन्हे बोगस असल्याचे उघडकीस आले होते. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराची अनेकदा पोलिसांकडून शहानिशा होत नाही. तक्रार आल्यानंतर तत्काळ गुन्हा नोंदविला जातो. संबंधित आरोपीला अटक केली जाते; मात्र चौकशीत दुसरीच माहिती बाहेर येत असल्याने तो गुन्हा बोगस असल्याचे नंतर पोलिसांच्या निदर्शनास आले होते, तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. अटकेमुळे आरोपीची नाहक बदनामी होते.

या बोगस गुन्ह्यांची आता पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी गंभीर दखल घेतली होती. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी त्यांनी सर्वच पोलीस ठाण्यांना एक आदेश जारी केला आहे. त्यात अशा प्रकारे कुठलीही तक्रार आल्यास त्याची माहिती आधी सहाय्यक पोलीस आयुक्तांना देण्यात यावी. त्यांच्या शिफारसीनंतर संबंधित गुन्ह्यांची फाईल पोलीस उपायुक्तांकडे पाठविली जावी. पोलीस उपायुक्तांच्या परवानगीनंतरच पोलिसांनी या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करावा, असे आपल्या आदेशात म्हटले होते. अशा तक्रारीची योग्य ती शहानिशा करून गुन्हा दाखल करताना दक्षता घेण्याचे आदेश माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिले होते.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल