मुंबई

मुख्यालयातील राजकीय पक्षावर पालिका मेहरबान! ना भाडे ना वीज वापर वसूली; भाडे वसुलीची माहितीच नाही; अजब पालिकेचा गजब दावा

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेकडे राजकीय पक्षास दिलेली परवानगी, आकारलेले भाडे आणि वीज आकाराची माहिती विचारली होती

नवशक्ती Web Desk

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतरही सर्व राजकीय पक्षाने कोणतीही परवानगी घेतली नाही ना, भाडे अदा करण्याची तसदी घेतली ना वीज आकार अदा केला. संपूर्ण मुख्यालयात एकच मीटर असल्याचा दावा करत पालिकेने परवानगी भाडे वसुलीची माहिती अभिलेखावर उपलब्ध नसल्याचा अजब दावा आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या उत्तरात केला आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेकडे राजकीय पक्षास दिलेली परवानगी, आकारलेले भाडे आणि वीज आकाराची माहिती विचारली होती. मुख्यालयातील कार्यकारी अभियंता कार्यालयाने गलगली यांस स्पष्ट केले की, मुंबई महापालिकेत नगरसेवक यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असतानाही २८ डिसेंबर २०२२ पर्यंत पालिका मुख्यालयात असलेल्या सर्व राजकीय पक्षाच्या कार्यालयात कामकाज सुरू होते. त्याच्या मंजुरीची माहिती त्यांच्या कार्यालयाच्या अभिलेखात उपलब्ध नाही. यासाठी आकारलेल्या भाड्याची माहिती त्यांच्या कार्यालयाच्या अभिलेखात उपलब्ध नाही. तर यांत्रिकी व विद्युत विभागाने कळविले की, महापालिका मुख्यालयासाठी जुन्या इमारतीसाठी एकच विद्युत मीटर असून नगरसेवक कार्यालयासाठी वेगळा विद्युत मीटर देण्यात आलेला नाही. यामुळे पालिका मुख्यालयात राजकीय पक्षांसाठी वापरण्यात येणाऱ्या वीज बिलाची रक्कम वेगळी देणे शक्य नाही.

वीज बिलाची वसुली पक्षांकडून करा!

अनिल गलगली यांच्या मते कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर नियमाप्रमाणे सर्व राजकीय पक्षाची कार्यालये बंद करणे आवश्यक असतानाही पालिका प्रशासनाने उदारता बाळगली. ज्या अधिकारी वर्गांची जबाबदारी आहे त्यांच्यावर कारवाई करत कार्यालय आणि वीज वापर झाला असून त्याची वसूली त्या त्या राजकीय पक्षाकडून करण्यात यावी.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा