मुंबई

मुंबईत आता केवळ ८३ ठिकाणीच खड्डे, पालिका प्रशासनाचा दावा

मुंबई महापालिका हद्दीत आजघडीला केवळ ८३ ठिकाणी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम बाकी असून आतापर्यंत वेळोवेळी ही कामे करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिका हद्दीत आजघडीला केवळ ८३ ठिकाणी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम बाकी असून आतापर्यंत वेळोवेळी ही कामे करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

याबाबत अतिरिक्त पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले की, यंदा जूनपासून पालिका हद्दीत रस्त्यांवर १६ हजार ६४५ ठिकाणी खड्डे पडले होते. त्यापैकी १६ हजार ५६२ ठिकाणचे खड्डे आतापर्यंत बुजविण्यात आले आहेत. आता ८३ ठिकाणी खड्डे भरण्याचे काम बाकी आहे. रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी पालिकेकडून मास्टीकचा वापर केला जातो.

सार्वजनिक गणेशोत्सव सोहळ्याबरोबरच अलीकडील काळात गणेश मूर्तींच्या आगमन मिरवणुकाही मोठ्या प्रमाणावर निघतात. अशा मिरवणुकांसाठी रस्तेदुरुस्ती, खड्डे भरण्याची कामे तातडीने करण्याची मागण सार्वजनिक मंडळांच्या समन्वय समितीकडून प्रशासनाकडे सातत्याने केली जाते.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण