संग्रहित छायाचित्र 
मुंबई

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा पूर्वनियोजित कट; हायकोर्टात तेजस्वी घोसाळकर यांचा दावा

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने याची गंभीर दखल न्यायालयाने घेत आरोपपत्र, आरोपींचे कॉल डिटेल रेकॉर्डस्, सीसीटीव्ही फुटेज स्वतः तपासणार असल्याचे स्पष्ट केले.

Swapnil S

मुंबई : दहिसर, बोरिवलीतील शिवसेनेच्या वर्चस्वा मुळेच अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा पूर्वनियोजित कट रचला गेला. या कटाचा तपास राजकीय दबावाखाली केला जात असल्याचा दावा तेजस्वी घोसाळकर यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात केला. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने याची गंभीर दखल न्यायालयाने घेत आरोपपत्र, आरोपींचे कॉल डिटेल रेकॉर्डस्, सीसीटीव्ही फुटेज स्वतः तपासणार असल्याचे स्पष्ट केले. अभिषेक यांच्या हत्येच्या कटातील सूत्रधारांची पोलीस पाठराखण करत असून, तपास करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवण्याचे निर्देश द्या, अशी विनंती करीत अभिषेक यांच्या पत्नी, माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी फौजदारी रिट याचिका केली आहे.

या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी तेजस्वी यांच्यातर्फे ॲड. भूषण महाडिक यांनी अभिषेक यांना मॉरिसने स्वतःच्या ऑफिसमध्ये बोलावले होते. तिथे फेसबूक लाईव्ह सुरू असताना मॉरिसने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि नंतर आत्महत्या केली, असे पोलिसांचे म्हणणे आहे; मात्र यामागे केवळ मॉरिस नव्हे, तर पूर्वनियोजित कट रचूनच हत्याकांड घडले आहे. मेहुल पारेख हा मॉरिसच्या कार्यालयाबाहेर होता हे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट होते. मेहुल हा मॉरिसचा जवळचा सहकारी होता. तो सूत्रधारांपैकी एक असताना पोलिसांनी त्याला अटक का केली नाही, असा सवाल करीत ॲड. महाडिक यांनी तपासावर राजकीय दबाव असल्याचा दावा केला.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?