मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या मुंबई दौरा ; सुरक्षेच्या कारणास्तव उद्या दोन तास मेट्रो सेवा बंद

अनेक लोक घरी परतण्यासाठी किंवा लोकल स्टेशन गाठण्यासाठी मेट्रोवर अवलंबून असतात

प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या दिवशी म्हणजेच १९ जानेवारीला मेट्रो वन सेवा दोन तास बंद राहणार आहे. त्या दिवशी संध्याकाळी ५.४५ ते ७.३० पर्यंत मेट्रो सेवा बंद राहणार आहे. मुंबई मेट्रोच्या मेट्रो 2Aआणि मुंबई मेट्रो 7 चे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यावेळी पंतप्रधानही मेट्रोने प्रवास करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेची खबरदारी म्हणून मेट्रो वन सेवा १९ जानेवारी रोजी सायंकाळी अडीच तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अंधेरी पूर्व भागात अनेक कार्यालये आहेत. संध्याकाळी, बहुतांश कार्यालये ही एकाच वेळी सुटतात, त्यामुळे अनेक लोक घरी परतण्यासाठी किंवा लोकल स्टेशन गाठण्यासाठी मेट्रोवर अवलंबून असतात. अशावेळी गर्दीच्या वेळेत मेट्रो बंद राहणार असल्याने घरी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

काही ऑपरेशनल आणि प्रशासकीय कारणांमुळे मेट्रो बंद राहणार असल्याचे मुंबई मेट्रो प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी यावेळी प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मेट्रोने केले आहे.

IND vs SA: मालिका विजयाची आज संधी; अहमदाबाद येथे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेशी पाचवा टी-२० सामना

बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीनांचा कट्टर विरोधक उस्मान हादीच्या मृत्यूनंतर हिंसाचार; हिंदू तरुणाला ठार केले, मीडिया कार्यालयांना जाळले

Thane: शिंदेंच्या मतदारसंघात भाजपला सेनेसोबत युती नको; भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक

शेजाऱ्याने ५ वर्षांच्या चिमुकल्याला 'फुटबॉल'सारखं तुडवलं; धक्कादायक CCTV Video व्हायरल, गुन्हा दाखल

निवृत्तीपूर्वी जज फारच षटकार मारत आहेत! सुप्रीम कोर्टानेच न्यायव्यवस्थेतील भ्रष्ट कारभारावर ओढले ताशेरे