मुंबई

रश्मी शुक्ला यांना पुन्हा सेवेत घेण्यास मनाई करा; उच्च न्यायालयात याचिका 

रश्मी शुक्ला यांना पुन्हा सरकारी सेवेत सामावून घेण्यास मनाई करा, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल

Swapnil S

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानंतर पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियमानुसार नियुक्ती करण्यात आलेली असताना रश्मी शुक्ला यांना रजेवर का पाठविण्यात आले, असा सवाल उपस्थित करत सेवानिवृत्त झालेल्या रश्मी शुक्ला यांना पुन्हा सरकारी सेवेत सामावून घेण्यास मनाई करा, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यावतीने ॲड. रवी जाधव यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. तर सेवानिवृत्तीनंतर रश्मी शुक्ला यांना कायम ठेवल्याने कॉग्रेसने याला आक्षेप घेतला.

चाचपडते विरोधक, धडपडते सरकार

मारू नये सर्प संताचिया दृष्टी

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश