मुंबई

स्पामध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

या माहितीनंतर बोगस ग्राहकाच्या मदतीने तिथे शहानिशा करण्यात आली होती. त्यात तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले

नवशक्ती Web Desk

मसाजच्या नावाने स्पामध्ये सुरू असलेल्या एका सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या युनिट सातच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी नाजनीन समीर शेख या महिला मॅनेजरला पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांन चार तरुणींची सुटका केली असून, या चौघींनाही मेडीकलनंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या गुन्ह्यांत राजेश्‍वरी बिरादार या चालक महिलेस पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. मुलुंड येथील निर्मल ऍविओर अपार्टमेंटमध्ये आर गोरा नावाचे एक स्पा असून, या स्पामध्ये मसाजच्या नावाने काही तरुणींना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले जात असल्याची माहिती युनिट सातच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर बोगस ग्राहकाच्या मदतीने तिथे शहानिशा करण्यात आली होती. त्यात तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने तिथे छापा टाकला होता.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

गिलचा पुन्हा शतकी नजराणा; चौथ्या दिवसअखेर भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर

जुलै महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल