मुंबई

मुलुंडकरांची प्रकल्पाविरोधात जनजागृती: आरोग्य, पर्यावरणावर परिणाम; स्थानिकांचा दावा

मुलुंडमधील सर्व सोसायट्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रविवारी मुलुंड पश्चिममधील ॲशफोर्ड रॉयल या इमारतीमध्ये हे अभियान राबविण्यात आले.

Swapnil S

मुंबई : धारावी प्रकल्पातील अपात्र रहिवाशांचे मुलुंडमध्ये पुनवर्सन, प्रकल्प बाधितांसाठी घरांची निर्मिती या विरोधात मुलुंडकरांनी आधीच विरोध दर्शवला आहे. आता मुलुंडमधील इमारती, सोसायटी याठिकाणी जाऊन प्रकल्पामुळे मुलुंडकरांच्या आरोग्यावर, पर्यावरणावर परिणाम होणार, असा दावा करत याबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

मुलुंड येथील वाढत्या लोकसंख्येमुळे सोयीसुविधांवर ताण येत आहे. त्यात मुलुंड पूर्वेकडील वझे-केळकर काॉलेज परिसरात प्रकल्प बाधितांसाठी साडेसात हजार सदनिका बांधण्यात येणार आहेत. यामुळे मुलुंडच्या लोकसंख्येत ५० ते ६० हजारांची भर पडणार आहे. त्यात आता धारावी पुनर्विकास प्रकल्पातील नागरिकांसाठी मुलुंड डम्पिंग ग्राऊंड आणि जकात नाक्याजवळ ६४ एकरवर घरे बांधण्याचा निर्णय प्रस्तावित आहे. त्यास मुलुंडकरांनी विरोध केला आहे. सरकारच्या या निर्णयास विरोध करण्यासाठी 'प्रयास' या सामाजिक संस्थेतर्फे ४ फेब्रुवारीला मूक मानवी साखळी उभारण्यात आली होती. त्यात हजारो नागरिक सहभागी झाले होते.

मुलुंडमधील सर्व सोसायट्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रविवारी मुलुंड पश्चिममधील ॲशफोर्ड रॉयल या इमारतीमध्ये हे अभियान राबविण्यात आले. तत्पूर्वी मुलुंड पूर्व येथील अनेक सोसायट्यांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.

संस्थेचे स्वयंसेवक विविध सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांना प्रकल्पांची माहिती देऊन सुरू असलेल्या चळवळीमध्ये सहभागी करून घेत आहेत, अशी माहिती 'प्रयास'चे अध्यक्ष ॲड. सागर देवरे यांनी दिली.

लवकरच जाहीर सभा

या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी कायदेशीर लढाईबरोबरच जनआंदोलन उभे करण्याच्या हेतूने संस्थेचे सभासद काम करत आहेत. मोठ्या प्रमाणात नागरिक या चळवळीत सहभागी होत असून लवकरच 'एल्गार मुलुंडकरांचा' ही जाहीर सभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभेला विविध मान्यवर नागरिकांना मार्गदर्शन करणार असून, चळवळीची पुढील दिशा या सभेत जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रयास संस्थेमार्फत देण्यात आली आहे.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास