PM
मुंबई

‘ग्रीनिंग मुंबई’ पुस्तिकेचे आश्विनी भिडे यांच्या हस्ते प्रकाशन

Swapnil S

मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झाडांची लागवड करणे काळाची गरज आहे. हिरव्या मुंबईसाठी पालिकेच्या उद्यान विभागामार्फत नवनवीन उपक्रम राबवित असते. विविध संस्था, सामाजिक संघटनादेखील राबत असतात; मात्र हे प्रयत्न एकतर्फी राहायला नको म्हणून ‘ग्रीनिंग मुंबई’ या माहिती पुस्तिकेद्वारे सर्वसामान्य मुंबईकर यात खारीचा वाटा उचलू शकतात. आपली मुंबई अधिकाधिक हिरवी रहावी, यासाठी मुंबईकरांनी सहभाग घ्यावा, पुढाकार घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे)  आश्विनी भिडे  यांनी केले. दरम्यान, हिरव्या मुंबईसाठी मुंबईकरांनी १० फेब्रुवारीपर्यंत सूचनांची नोंद करावी, असे आवाहन उद्यान विभागाने केले आहे.

मुंबईतील घरांची बाल्कनी, इमारतींचे छत, गृहनिर्माण संस्थांचे आवार, लहान लहान बगीचे आदी ठिकाणी कमीत कमी जागेत विविध प्रकारची रोपटी, झाडे, फुल-फळ झाडे कशी लावावीत, यासाठी पालिकेने 'डब्ल्यूआरआय इंडिया' या संस्थेच्या सहकार्याने तयार केलेल्या ‘ग्रीनिंग मुंबई’ या मार्गदर्शक पुस्तिकेचे महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी प्रकाशन करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या.

उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, उप अधीक्षक (वृक्ष प्राधिकरण) ज्ञानदेव मुंडे, 'डब्ल्यूआरआय इंडिया'च्या कार्यक्रम प्रमुख लुबैना रंगवाला, ‘ओइकोस फॉर इकोलॉजिकल सर्व्हिसेस आणि ट्रान्सफॉर्मिंग’च्या श्रीमती कीर्ति वाणी, टाटा समाज विज्ञान संस्था अर्थात ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’च्या अविनाश कौर आदी मान्यवरांसह पर्यावरणविषयक अभ्यासक उपस्थित होते.       

असे नोंदवा आपले मत!

या माहिती पुस्तिकेची ऑनलाईन लिंक (URL) http://surl.li/ojnfk ही असून, त्याद्वारे माहिती पुस्तिका पीडीएफ स्वरुपात डाउनलोड करता येऊ शकते. त्यातील पृष्ठ क्रमांक चार वरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर  मुंबईकर या पुस्तिकेबाबत आपली मते नोंदवू शकतात. अंतिम सुचनांचा समावेश करुन  ८ मार्च २०२४ रोजी या पुस्तिकेची सर्व समावेशक आवृत्ती उपलब्ध करुन देण्यात येईल.

लहान, मध्यम आणि मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असल्यास कशाप्रकारे वृक्षारोपण करता येणार, याबाबत पुस्तिकेत सचित्र आणि शास्त्रीय माहिती देण्यात आली आहे. मुंबईचे पर्यावरण संतुलन टिकून राहावे म्हणून आपण मुंबईकर काय-काय करू शकतो, याबाबतही पुरेशा माहितीचा समावेश या पुस्तिकेत करण्यात आला आहे.

-जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त