पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांनी लक्ष द्या! मिसिंग लिंक आज अंशत: बंद; वाचा सविस्तर 'एआय'ने बनविलेली प्रतिमा
मुंबई

पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांनी लक्ष द्या! मिसिंग लिंक आज अंशत: बंद; वाचा सविस्तर

पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. मिसिंग लिंक आज दुपारी काही काळ वाहतुकीसाठी बंद राहणार असून, वाहनचालकांनी प्रवासाआधी अपडेट जाणून घ्यावे.

Krantee V. Kale

मुंबई : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंकच्या पुणेहून मुंबई दिशेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर बुधवार १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम आणि मॉकड्रील करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत कनेक्टिंग लिंकवरील पुणे-मुंबई मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येईल, तर मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरु राहणार आहे.

कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक विना व्यत्यय सुरू राहण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ प्रयत्नशील आहे. त्यानुसार पुण्याहून मुंबई दिशेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम आणि मॉकड्रील करण्यात येणार आहे.

वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा...

या कालावधीत सर्व वाहने जुन्या मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील घाट मार्गातून मुंबईच्या दिशेने वळविण्यात येणार आहेत. तर कनेक्टिंग लिंकवरुन मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरु राहणार आहे. तीन तास एक मार्गिका बंद ठेवण्यात येणार असल्याने कनेक्टिंग लिंक मार्गिकेवरील वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन एमएसआरडीसी प्रशासनाने केले आहे. दुरूस्ती कामाच्या वेळेत मार्गिकेवरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाकडे संपर्क साधावा असे आवाहनही केले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक चार रात्री बंद; ऐरोली-काटई नाका पुलावर गर्डर टाकण्याचे काम, वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

Mumbai : जोगेश्वरी उड्डाणपुलाची होणार दुरुस्ती; महापालिका २७ कोटी २४ लाख खर्च करणार, सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन

Tirupati Blast : फार्मा कंपनीत मोठी दुर्घटना! बॉयलरच्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी; बचावकार्य सुरू, VIDEO

CNG Car Blast : गॅस भरतानाच कारचा भीषण स्फोट; थरकाप उडवणारा VIDEO, वाहनचालकांनो 'या' चुका टाळा, नाहीतर...

Mumbai : 'ठाकरें'च्या मोर्च्याचा मार्ग बदलला; मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालय असा निघेल मोर्चा, पोलिसांच्या विनंतीनुसार घेतला निर्णय