(संग्रहित छायाचित्र) 
मुंबई

पालिकेच्या नियमांचे पालन रेल्वेला करावेच लागणार; होर्डिंग्ज दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी रेल्वेला खडसावले

Swapnil S

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हद्दीत २५० होर्डिंग्ज असून ४५ धोकादायक स्थितीत असल्याने आपत्कालीन कायद्यांतर्गत मध्य व पश्चिम रेल्वेला नोटीस बजावली आहे. पालिकेच्या नोटीसीनंतर ७ बेकायदा होर्डिंग्ज हटवण्यात आली आहेत. मात्र ४० बाय ४० फुटावरील बेकायदा होर्डिंग्ज काढावेच लागणार. होर्डिंग्जबाबत पालिकेचे नियम असून त्याचे पालन रेल्वे प्रशासनाला करावेच लागणार, अशा शब्दांत मध्य व पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना खडसावल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेनंतर रेल्वे हद्दीतील ४५ बेकायदा होर्डिंग्ज काढण्याबाबत पालिकेने डिझास्टर ॲक्टअंतर्गत नोटीस बजावली. मात्र पालिकेच्या नोटिसीकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले आणि टिळक पुलावर ७ बेकायदा होर्डिंग्ज पालिकेने अखेर हटवले. पालिकेचे नियम रेल्वेला लागू होत नाही, असे उत्तर रेल्वे प्रशासनाकडून मुंबई महापालिकेला वेळोवेळी देण्यात येते. मात्र मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पालिकेचे धोरण, नियम यांचे पालन मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनाला करावेच लागणार, असे आदेश रेल्वे प्रशासनाला दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त