मुंबई : मुंबईत मनसे व ठाकरे सेनेसोबत जाण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची कसरत सुरू असताना शरद पवारांच्या समर्थक राखी जाधव यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. राखी जाधव यांनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपची घाटकोपर मध्ये ताकद वाढली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबई व पुण्यात जुळवाजुळवीचे प्रयत्न सुरू असताना घाटकोपर प्रभाग क्रमांक १३१ च्या माजी नगरसेविका राखी जाधव यांनी सोमवारी भाजपात प्रवेश केला. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशीष शेलार, भाजप नेते पराग शहा, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आदी नेत्यांच्या उपस्थितीत राखी जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
राखी जाधव या २०१२ मध्ये व २०१७ च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३१ मधून निवडून आल्या होत्या.