मुंबई

मुंबईत दुर्मिळ झाडे बहरणार ; देशी प्रजातीच्या झाडांची उद्यानात लागवड

प्रतिनिधी

मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झाडांची लागवड करणे काळाची गरज आहे. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान वनस्पती व प्राणीसंग्रहालयाद्वारे पालिकेच्या विविध १,१०० उद्यानांत देशी प्रजातीच्या झाडांचे रोपण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ही दुर्मिळ झाडे बहरलेली असतील.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार आणि उपआयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरात तब्बल ११०० ठिकाणी या झाडांचे बिजारोपण करण्यात येणार आहे. सध्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात ही रोपे तयार करण्याचे काम सुरू असल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

दुर्मिळ झाडांची लागवड!

या देशी झाडांमध्ये आवळा, बेल, शिकेकाई, पळस, अंजन, शेवर, रिठा, बेहेडा, चिलार, करंज, खैर, शिशम, आपटा, चंदन, रक्तचंदन, काटे बाभळ, बकुळ, कण्हेर, हिरडा, महोगणी, शेवर, सागरगोटा, कवठ, भोकर, शमी, वड आदी झाडांची रोपे सध्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात तयार करण्यात येत आहेत.

११०० ठिकणी ही झाडे लावणार

सध्या या झाडांच्या बियांपासून रोपे तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर ११०० ठिकाणी ही झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना आपल्या अवतीभवती ही दुर्मिळ झाडे बहरलेली दिसतील.

फक्त ६५ हजारात मिळतीये Electric Scooter, चालवण्यासाठी लायसन्सचीही गरज नाही; जाणून घ्या रेंज अन् किंमत

पुणे विमानतळावर अपघात; 'टग ट्रॅक्टर'ला धडकले एअर इंडियाचे १८० प्रवाशांनी भरलेले विमान

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही

CSMT तील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी आजपासून १५ दिवस ब्लॉक