मुंबई

वडाळा, शिवडीकरांची गैरसोय दूर सामुदायिक प्रसाधनगृहांची पुनर्बांधणी; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

मुंबईमध्ये अनेक झोपडपट्टी बहुल विभागांमध्ये लॉट १२ मधून वस्ती स्वच्छता कार्यक्रमा अंतर्गत सामुदायिक प्रसाधनगृहांचे पुर्नबांधणी करण्यात येत आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ येथील एफ- दक्षिण विभागातील राम टेकडी मार्ग व हिमालया चाळ, शिवडीतील डब्बेवाला चाळ तसेच वडाळा एफ उत्तर विभागातील बरकत अली नगर येथील सामुदायिक प्रसाधनगृह पुनर्बांधणीचे भूमिपूजन मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शौचालयांमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

महापालिकेच्या वतीने मुंबईकर नागरिकांसाठी विविध मुलभूत नागरी सेवा-सुविधा पुरवण्यात येतात. त्यात कम्युनिटी टॉयलेट अर्थात सामुदायिक प्रसाधनगृहांचा समावेश आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत या प्रसाधनगृहांची दैनंदिन स्वच्छता, निर्जंतुकीकरण केले जाते. परळ, शिवडी आणि वडाळा येथील सामुदायिक प्रसाधनगृह बांधणीचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे. या कामांचे भूमिपूजन मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार कालिदास कोळंबकर, आर. तमील सेल्वन, उपआयुक्त चंदा जाधव, उपआयुक्त रमाकांत बिरादार, सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले आदी याप्रसंगी उपस्थित होते.

शहरात ८६ ठिकाणी प्रसाधनगृहांची पुर्नबांधणी

मुंबईमध्ये अनेक झोपडपट्टी बहुल विभागांमध्ये लॉट १२ मधून वस्ती स्वच्छता कार्यक्रमा अंतर्गत सामुदायिक प्रसाधनगृहांचे पुर्नबांधणी करण्यात येत आहे. मुंबई शहर विभागात एकूण ८६ ठिकाणी अशा प्रसाधनगृहांची पुर्नबांधणी केली जाणार आहे. राम टेकडी मार्ग येथील सामुदायिक प्रसाधनगृहांत एकूण १९ शौचकुपे, डब्बेवाला चाळीसाठी एकूण २२ शौचकुपे, हिमालया चाळसाठी एकूण ३७ शौचकुपे आणि बरकत अली नगर येथे एकूण ५१ शौचकुपे बांधण्यात येणार आहेत.

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

अहिल्यानगरमध्ये तणाव; रास्ता रोको, लाठीमार

भारत-भूतान रेल्वेमार्गाने जोडणार; प्रकल्पाचा संयुक्त आराखडा जाहीर

राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू; केरळ भाजप प्रवक्त्याचे धक्कादायक विधान

परदेशी चित्रपटांवर १०० टक्के टॅरिफ; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; बॉलीवूडला फटका बसणार