मुंबई

Recruitment: मुंबई महापालिकेत १८४६ जागांवर भरती

मुंबई महापालिकेत कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदाच्या १,८४६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, मंगळवार, २० ऑगस्टपासून ९ सप्टेंबरपर्यंत इच्छुकांना त्यासाठी अर्ज करता येतील.

Swapnil S

प्रतिनिधी/ मुंबई

मुंबई महापालिकेत कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदाच्या १,८४६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, मंगळवार, २० ऑगस्टपासून ९ सप्टेंबरपर्यंत इच्छुकांना त्यासाठी अर्ज करता येतील.

महापालिकेने याबाबत https://www.mcgm.gov.in संकेतस्थळावर जाहिरात दिली आहे. तेथे https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर सविस्तर माहिती दिली आहे. महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील रु. २५,५००-८११०० (पे मॅट्रिक्स-एम १५) अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ‘कार्यकारी सहाय्यक’ (पूर्वीचे पदनाम : लिपिक) या संवर्गातील १,८४६ रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती (१४२), अनुसूचित जमाती (१५०), विमुक्त जाती-अ (४९), भटक्या जमाती-ब (५४), भटक्या जमाती-क (३९), भटक्या जमाती-ड (३८), विशेष मागास प्रवर्ग (४६), इतर मागासवर्ग (४५२), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (१८५), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (१८५), खुला प्रवर्ग (५०६) याप्रमाणे रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाईल. या पदांचे समांतर आरक्षणानुसार वर्गीकरण करण्यात आले असून, त्याची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये समाविष्ट आहे.

उमेदवारांसाठी मदतसेवा क्रमांक जाहीर

उमेदवारांनी भरलेल्या संपूर्ण अर्जाची प्रिंट काढून स्वत:जवळ ठेवावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. उमेदवारांच्या मार्गदशर्नासाठी ९५१३२५३२३३ हा मदतसेवा क्रमांकही जारी करण्यात येत आहे. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान (दुपारी १.३० ते २.३० वाजेदरम्यानचा भोजन कालावधी वगळता) या क्रमांकावर उमेदवारांना संपर्क साधता येईल.

जाहिरात, अटी व शर्तींसह प्रसिद्ध

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर या पदासाठीची संपूर्ण जाहिरात, अटी व शर्तींसह प्रसिद्ध करण्यात येत आहे. या जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्जाची लिंक (यूआरएल) देण्यात आली असून त्यावर क्लिक केल्यानंतर इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता येईल. आज, २० ऑगस्टपासून ९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येईल.

आपत्ती व्यवस्थापनात तुकाराम मुंढेंना ‘नो एंट्री’; पुन्हा विनिता वैद सिंघल यांची वर्णी

युद्धविराम धोक्यात! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हल्ला; होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव कायम, बैरुतमध्ये २०३ जणांचा मृत्यू

अखेर गारगाई धरण प्रकल्पाला मंजुरी; ठाकरे सेना समुद्राचे खारे पाणी गोडे करण्यावर ठाम, केंद्राची परवानगी लवकरच - गणेश खणकर

Assembly Elections 2026 : आसाम, केरळम विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान

मंदिर प्रवेशात विशिष्ट समुदायाला वगळल्याने समाजात फूट पडेल; शबरीमलाप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण