मुंबई

शिक्षकांसाठी खुशखबर! BMC भरणार १,३४२ शिक्षकांची पदे ; ‘अशी’ होणार पदभरती

Swapnil S

मुंबई : विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ होत असताना त्या तुलनेत शिक्षकांची संख्या कमी आहे. शिक्षकांची संख्या भरून काढण्यासाठी पालिकेच्या चार माध्यमांतील शाळांमध्ये १,३४२ शिक्षकांची जम्बो भरती करण्यात येणार आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबई महापालिका शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. मात्र असे असताना मागील काही वर्षांत शिक्षकांची भरती झालेली नाही. प्राथमिक शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने चार माध्यमांसाठी तब्बल १३४२ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मोठी पदभरती होणार असून त्यासाठी जाहिरात दिली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा ८ भाषिक माध्यमांच्या शाळा चालवल्या जातात. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे १,१२९ शाळांमध्ये मिळून सध्या ३ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोना महामारीनंतर पालिका शाळांतील पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण विभागाने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. सीबीएसईच्या शाळा, अन्य बोर्डांच्या शाळा, शैक्षणिक वस्तू वाटप यामुळेही विद्यार्थी संख्या वाढली आहे. सध्या शाळांतील पटसंख्या वाढली असताना शिक्षकांची पदे मात्र मागील काही वर्षापासून रिक्त आहेत. ही पदे भरली जात नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने चार माध्यमांसाठी मोठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

फेब्रुवारी अखेरपर्यंत भरती प्रक्रिया

शिक्षण विभागाकडून यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. त्यामुळे फेब्रुवारी म्हणजे या महिन्याच्या अखेरपर्यंत पदभरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान, पदभरतीत पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांना संधी मिळणार आहे. शिक्षकांच्या जागा रिक्त असल्या तरी सध्या तासिका तत्त्वावर काही सेवानिवृत्त शिक्षकांची सेवा घेण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांची कमतरता भरून काढली आहे. परंतु, या भरतीमुळे कायमस्वरूपी शिक्षक मिळतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

‘अशी’ होणार पदभरती!

पालिकेच्या शिक्षण विभागातील रिक्त पदे राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे भरली जाणार आहेत. शिक्षण विभागाने आता याकरिता जाहिरात दिली आहे. पात्र उमेदवारांना १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर छाननी करून मग त्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत कागदपत्रांची पडताळणी करून मग त्यांना नियुक्ती पत्र दिले जाईल. फेब्रुवारी अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

माध्यम आणि पदे

इंग्रजी - ६९८

हिंदी - २३९

मराठी - २१६

उर्दू - १८९

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

Marathi Serial: लोकप्रिय मालिका 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' प्रेक्षकांपुढे येणार नवीन अवतारात!