मुंबई

मुंबईत जिओचे नेटवर्क कोलमडले; संतप्त ग्राहकांचा सोशल मीडियावर संताप व्यक्त

रिलायन्स जिओच्या ग्राहकांनी मंगळवारी दुपारी सोशल मीडियावर नेटवर्कबाबतची तक्रार मोठ्या संख्येने नोंदविली.

Swapnil S

मुंबई : रिलायन्स जिओच्या ग्राहकांनी मंगळवारी दुपारी सोशल मीडियावर नेटवर्कबाबतची तक्रार मोठ्या संख्येने नोंदविली. तर डाउन डिटेक्टर या ट्रॅकिंग वेबसाइटने १७ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून जिओच्या नेटवर्कमध्ये व्यत्यय येत असल्याचे स्पष्ट केले.

अनेक रिलायन्स जिओ वापरकर्त्यांना मंगळवारी दुपारपासूनच कॉल तसेच मेसेजकरिता अडचणी येत होत्या. कॉल ड्रॉप वारंवार होत असून मोबाईल इंटरनेटही वापरता येत नसल्याच्या तक्रारी वाढल्या.

१७ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३६ पर्यंत १०,५५२ जिओ वापरकर्त्यांनी नेटवर्क त्रुटी नोंदवली. तर सकाळी ११.३० वाजता ६९५ जणांनी तक्रार नोंदविली. अनेक ग्राहकांनी सुमार नेटवर्कबाबत आपली तक्रार विविध सोशल मीडियावर केली. काहींनी मजेशीर मिम्सही शेअर केले.

एका ग्राहकाने सोशल मीडियावर दावा केला की, रिलायन्स जिओच्या आयडीसी डेटा सेंटरला आग लागली आहे. त्यामुळेच नेटवर्क बंद आहे. मात्र दूरसंचार कंपनीने आगीची घटना किंवा आउटेजबद्दल अधिकृत घोषणा केली नाही. तथापि, आता सेवा पूर्ववत झाल्याचे समजते.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती