मुंबई

शिवसेना पक्ष प्रवेशाच्या तोंडावर मंगेश सातमकर यांना दिलासा ; 'त्या' तरुणीकडून लैगिंक शोषणाची तक्रार मागे

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर मे महिन्यात एका २९ वर्षीय तरुणीने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते

नवशक्ती Web Desk

ठाकरे गटाचे माजी नगरसेवत मंगेश सातमकर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असताना मंगेश सातमकर यांनी दिलासा मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका महिलेकडून लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. या तक्रारदार महिलेने आता सातमकर यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. तसंच सातमकर यांना क्लिन चिट दिली आहे. सातमकर आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

काय आहे प्रकरण?

शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर मे महिन्यात एका २९ वर्षीय तरुणीने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या आरोपाप्रकरणी तरुणीने वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाख केली होती. मात्र, गैरप्रकार अँटॉप हिल येथे घडल्याने अँटॉप हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदार तरुणी ही सातमकर यांच्यासोबत काम करणारी होती. त्यांनी लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप तरुणीने केला होता.

तक्रारदार तरुणीकडून क्लीन चीट

आता लैंगिष शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीने सातमकर यांना क्लीन चीट दिली आहे. या तरुणीने प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की, आम्ही एकाच क्षेत्रात कार्यरत असल्याने आमच्यात वाद झाले होते. त्यातून गैरवर्वणूक देखील झाली. मात्र, आम्हा दोघांनाही आता आपली चूक झाल्याचं लक्षात आलं आहे. त्यामुळे कोर्टाबाहेर हे प्रकरण मिटवण्याचे ठरवण्यात आले आहे. असं तरुणीने म्हटलं आहे. तसंच ही तक्रार मागे घेण्यासाठी कोणाचा दबाव नसून आपण स्वखुशीने तक्रार मागे घेत आहोत, असं देखील तरुणीने म्हटलं आहे.

कोण आहेत मंगेश सातमकर?

मंगेश सातमकर हे १९९४ मध्ये पहिल्यांदा मुंबई महापालिकेत नगरसेवक पदी निवडून आले. त्यानंतर २००२,२००७ आणि २०१७ साली ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी २००४,२००६, २००७ आणि २०१८ मध्ये महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषवलं. २०१४ साली त्यांनी सायन कोळीवाडा विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. यावेली मात्र त्यांचा पराभव झाला.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?