मुंबई

विजेचे खांब, लाइट्सची दुरुस्ती आता वेळेत; बेस्टच्या ताफ्यात लवकरच ८ एरियल लिफ्ट वाहन

रस्त्यावरील स्ट्रीट लाइटिंगचे पोल व त्यावरील दिवे यांच्या दुरुस्तीसाठी एरियल लिफ्ट वाहने ही महत्त्वाची भूमिका बजावतात.

Swapnil S

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवर ३३ हजारांहून अधिक विजेचे खांब आहेत. यापैकी बहुतांश विजेच्या खांबांची वयोमर्यादा संपुष्टात आली आहे. त्यामुळे वारंवार दुरुस्तीचे कॉल येत असतात. परंतु दुरुस्ती व्हॅन अर्थात एरियल लिफ्ट वाहनेही नादुरुस्त झाली आहेत. त्यामुळे नवीन ८ एरियल लिफ्ट वाहने खरेदीचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून पात्र कंत्राटदाराला दुरुस्तीचे काम करावे लागणार, असे बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले आहे.

मुंबई शहरातील वीज ग्राहकांच्या व रस्त्यावरील विजेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी बेस्ट उपक्रमाने नवीन एरियल लिफ्ट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या असलेली एरियल लिफ्ट वाहने जुनी झाल्यामुळे नवीन एरियल लिफ्ट वाहने खरेदी करण्यात येणार आहेत.

रस्त्यावरील स्ट्रीट लाइटिंगचे पोल व त्यावरील दिवे यांच्या दुरुस्तीसाठी एरियल लिफ्ट वाहने ही महत्त्वाची भूमिका बजावतात. या वाहनावर उंच शिडी असते, ती शिडी उंच नेत लाइटची दुरुस्ती करत येते. हे काम जिकीरीचे असल्याने या वाहनांची दुरुस्ती वारंवार करावी लागते. बेस्टकडे सध्या असलेली ८ एरियल लिफ्ट वाहने जुनी झाल्याने व भविष्यातील धोका लक्षात घेता नव्याने वाहने घेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल