मुंबई

मुलांवर दुष्परिणाम झाल्यास जबाबदारी पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाची; जंतनाशक गोळ्यांचे वाटप पुन्हा सुरू

या गोळ्या लहान मुलांनी खाल्ल्यास त्यांना उलटी, जुलाब होण्याची शक्यता आहे. यामुळे आरोग्यसेविकांना जबाबदार धरले जाण्याची शक्यता

प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जात होते. या गोळ्या वाटप करत असताना पाकीट उघडताच गोळ्यांची पावडर होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे मुलांवर दुष्परिणाम होण्याची भीती असल्याने आरोग्य सेविकांनी या गोळ्यांचे वाटप थांबवले होते. त्यानंतर आरोग्य विभागाशी झालेल्या चर्चेत मुलांवर दुष्परिणाम झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाची असेल, या अटीवर गोळ्यांचे वाटप करण्यास आरोग्यसेविकांनी सुरुवात केली आहे.

या गोळ्या लहान मुलांनी खाल्ल्यास त्यांना उलटी, जुलाब होण्याची शक्यता आहे. यामुळे आरोग्यसेविकांना जबाबदार धरले जाण्याची शक्यता असल्याने आरोग्यसेविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, अशी माहिती अॅड. प्रकाश देवदास यांनी दिली.

आरोग्य विभागाची जबाबदारी!

शनिवारी महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची आरोग्यसेविकांसोबत बैठक झाली. काही ठिकाणी गोळ्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्याशी चर्चा झाल्यावर गोळ्यांचा नवीन स्टॉक देण्यात आला आहे. या गोळ्या वाटल्यावर मुलांवर कोणतेही दुष्परिणाम झाले, तर त्याला सर्वस्वी जबाबदार पालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग असेल, असे पत्र देण्यात आले आहे. आरोग्य विभागाने त्याला होकार दिल्यानंतर शनिवारपासून जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे, म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी सांगितले.

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

निवडणूक आयोगाला फक्त चिन्ह देण्याचा अधिकार; उद्धव ठाकरेंची टीका