एक्स @PratapSarnaik
मुंबई

रिक्षा व टॅक्सीचालकांसाठी निवृत्ती सन्मान योजना; ६५ वर्षांवरील सभासदांना रु. १० हजार सन्मान निधी, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा, मीटर टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळामार्फत राज्यातील रिक्षा, टॅक्सीचालकांना विविध लाभ देण्यात येणार आहेत.

Swapnil S

मुंबई : धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा, मीटर टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळामार्फत राज्यातील रिक्षा, टॅक्सीचालकांना विविध लाभ देण्यात येणार आहेत. मंडळाच्या ६५ वर्षांवरील सभासद चालकांना निवृत्ती सन्मान योजनेंतर्गत विशिष्ट दिनानिमित्त १० हजार रुपये सन्मान निधी दिला जाणार आहे. त्यासाठी रिक्षा, टॅक्सीचालकांना आवश्यक अटी, शर्ती पूर्ण कराव्या लागणार आहेत. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी याबाबतची घोषणा केली.

रिक्षा व मीटर टॅक्सीचालकांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा तसेच सभासद चालकांसाठी जीवन विमा, अपंग विमा अशा आरोग्य योजना राबविणे विचाराधीन आहेत. तसेच त्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजनादेखील राबवली जाणार आहे. तसेच कर्तव्यावर असताना एखाद्या चालकास दुखापत झाल्यास त्याला या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाणार आहे, तर उत्कृष्ट रिक्षा-टॅक्सीचालक, उत्कृष्ट रिक्षा/टॅक्सीचालक संघटना तसेच उत्कृष्ट रिक्षा स्टॅन्ड यांच्यासाठी आकर्षक बक्षीस योजना दरवर्षी राबवली जाईल, असे सरनाईक यांनी सांगितले.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video