मुंबई

राज्यात बीए ४, ५ व्हेरिएंटचा धोका वाढला, पुण्यात ३६ नवीन रुग्णांची नोंद

या नमुन्यांची तपासणी पुणे आणि मुंबई येथील इन्साकॉग अंतर्गत प्रयोगशाळांमध्ये करण्यात आले आहे

प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी कोरोनाचा नवीन व्हेरिएंट बीए ४, बीए ५ व बीए २.७५ व्हेरिएंटचा प्रसार झपाट्याने होत आहे. रविवारी पुण्यात बीए ४ चे १९ तर बीए २.७५ व्हेरिएंटचे १७ रुग्ण आढळल्याने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए ४ आणि बीए ५ रुग्णांची संख्या १३२ तर बी ए. २.७५ रुग्णांची संख्या ५७ वर पोहोचली आहे.

बी जे वैद्यकीय, पुणे यांच्या अहवालानुसार राज्यात बी ए. ४ चा १ तर बी ए.५ चे १८ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय बी ए. २.७५ व्हेरीयंटचे देखील १७ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत. या नमुन्यांची तपासणी पुणे आणि मुंबई येथील इन्साकॉग अंतर्गत प्रयोगशाळांमध्ये करण्यात आले आहे. हे सर्व नमुने २५ जून ते ४ जुलै २०२२ या कालावधीतील आहेत. या रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत असल्याचे राज्य सरकारच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश