मुंबई

३० वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात निर्दोष सुटका; सबळ पुराव्या अभावी आरोपी मुक्त

लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पिडित मुलीचा जबाब 'विश्वसनीय' असणे आवश्यकच आहे. पीडित मुलीचा जबाब विश्वसनीय असेल तरच आरोपीचे दोषत्व सिद्ध करण्यासाठी केवळ तिचा जबाबही पुरेसा ठरू शकतो, असा महत्वपूर्ण निर्वाळा दिंडोशी सत्र न्यायालयाने देत आरोपीची सबळ पुराव्याअभावी ३० वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका केली.

Swapnil S

मुंबई : लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पिडित मुलीचा जबाब 'विश्वसनीय' असणे आवश्यकच आहे. पीडित मुलीचा जबाब विश्वसनीय असेल तरच आरोपीचे दोषत्व सिद्ध करण्यासाठी केवळ तिचा जबाबही पुरेसा ठरू शकतो, असा महत्वपूर्ण निर्वाळा दिंडोशी सत्र न्यायालयाने देत आरोपीची सबळ पुराव्याअभावी ३० वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका केली.

रोशनलालला १० जुलै १९९५ रोजी अटक केली होती. ३० ऑक्टोबर १९९५ रोजी त्याची जामीनावर सुटका झाली होती. आरोपीने लैंगिक संबंध ठेवण्याच्या हेतूने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा आरोप होता. पीडित मुलीने आरोपीविरोधात तक्रार केलीच नव्हती, असे सांगून पोलिसांनी केलेले आरोप नाकारले. त्याची दखल घेत अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. जी. ढोबळे यांनी आरोपी रोशनलालला सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले. सरकारी पक्षाने पीडित मुलीव्यतिरिक्त साक्षीदाराचा जबाब नोंदवलेला नाही. पीडित मुलीच्या जबाबाला पुष्टी देणारे सबळ पुरावे नसल्याचे विचारात घेऊन आरोपीला दिलासा दिला.

२३ दिवसच खटला चालला

आरोपी रोशनलाल ठाकूरला लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात नाहक गोवण्यात आल्याचे अॅड. स्वप्नील कदम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. रोशनलाल हा केवळ आर्थिक परिस्थिती नसल्याने तुरुंगात खितपत पडला होता. या प्रकरणात 'दर्द से हमदर्द तक' संस्थेने रोशनलालला कायदेशीर मदत पुरवली आणि ३० वर्षांनी रोशनलालवरील गुन्ह्याचा कलंक पुसला गेला. खटला सुरू झाल्यावर केवळ २३ दिवसच केस चालली.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video