संग्रहित छायाचित्र 
मुंबई

रिपाइंला महायुतीने सोडली एकच जागा; १३ वॉर्डात स्वबळावर; मित्रपक्षासोबतच लढत

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले महायुती सोबत असून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीकडून रिपाइंला फक्त एकच जागा देऊ केली आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुंबई आता १३ जागांवर उमेदवार उभे करत थेट भाजप व अजित पवार गटाला मोठे आव्हान दिले आहे.

Swapnil S

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले महायुती सोबत असून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीकडून रिपाइंला फक्त एकच जागा देऊ केली आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुंबई आता १३ जागांवर उमेदवार उभे करत थेट भाजप व अजित पवार गटाला मोठे आव्हान दिले आहे.

महायुतीकडून शिवसेनेच्या कोटयातील चेंबूर पांजरापोळ परिसरातील एकमेव जागा रिपाइंला सोडण्यात आली आहे. या ठिकाणी रिपाइंच्या कार्यकर्त्या प्रज्ञा सुनील सदाफुले या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. ही जागा सोडण्याचा दिलदारपणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखविल्याचे स्पष्ट करीत भाजपला टोला लगावला आहे. रिपाइंने ३८ जागांवर उमेदवार फायनल केले होते.

या वॉर्डात भाजप, राष्ट्रवादीशी सामना

भाजपचे उमेदवार असलेल्या वॉर्ड ५४, ५९, ६५, १०४, १८६ या पाच वॉर्डात आणि राकाँपा अजित पवार गटाचे उमेदवार असलेल्या वॉर्ड ३८,३९,५९, ११९, १८८ वॉर्डात रिपाइंचे उमेदवार स्वबळावर लढत आहेत. त्यामुळे मुंबईत शिवसेना भाजप युती झाली असली तरी राकाँपा अजित पवार गट आणि रिपाइं उमेदवारांचा मित्रपक्षांबरोबरच सामना रंगताना दिसणार आहे.

रिपाइंचे स्वबळावर लढणारे उमेदवार

-वॉर्ड २८ – यशदा कोंडे (कांदिवली पूर्व), वॉर्ड ३८ - वंदना संजय बोरोडे (दिंडोशी), वॉर्ड ३९ - अनुसया नवगिरे (दिंडोशी), वॉर्ड ५४ – रेशमा खान (गोरेगाव पूर्व), वॉर्ड ५९ - बाबू धनगर (वर्सोवा), वॉर्ड ६५ - जयंतीबाई गडा (अंधेरी पश्चिम), वॉर्ड ९३ - सचिन कासारे (बांद्रा पूर्व), वॉर्ड १०४ - विनोद जाधव (मुलुंड), वॉर्ड ११९ - प्रितम गाडे (टागोर नगर, विक्रोळी), वॉर्ड १२५ राजा गांगुर्डे (रमाबाई आंबेडकर नगर), वॉर्ड १८१- बापूसाहेब उर्फ बाबा काळे (कोरबा मिठागार, वडाळा), वॉर्ड १८६ स्नेहा सिद्धार्थ कासारे (धारावी), वॉर्ड १८८ - रॉबिन्सन मारन नायर (धारावी)

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

मुंबई 'पाताळलोक'चे काम वेगवान; ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह भुयारी बोगद्याचे ६५० मीटर खोदकाम पूर्ण

३६४ बसवाहकांची BEST मध्ये सरळसेवा भरती; १ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

Mumbai : नगरसेवक रमेश म्हात्रे प्रकरणाचा तपास आता डीसीपींकडे; डॉक्टरांना मारहाण करणे चांगलेच भोवले

FDA ची कारवाई बेकायदेशीर; दूध विक्रेत्यांचे परवाने निलंबनाच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती