गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई  
मुंबई

सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण: बिष्णोई लवकरच मुंबई पोलिसांच्या ताब्यात

सलमान खानच्या घरावर गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांना बिष्णोई हवा आहे. परंतु गृहमंत्रालयाच्या एका आदेशानुसार ३० ऑगस्टपर्यंत बिष्णोईला साबरमती तुरुंगातून इतरत्र हलविण्यासा मनाई करण्यात आली होती.

Swapnil S

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मुख्य संशयित लॉरेन्स बिष्णोई लवकरच मुंबई पोलिसांच्या ताब्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. बिष्णोई सध्या गुजरात येथील साबरमती तुरुंगात आहे.

सलमान खानच्या घरावर गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांना बिष्णोई हवा आहे. परंतु गृहमंत्रालयाच्या एका आदेशानुसार ३० ऑगस्टपर्यंत बिष्णोईला साबरमती तुरुंगातून इतरत्र हलविण्यासा मनाई करण्यात आली होती. मात्र, आता ही मुदत संपताच मुंबई पोलिसांच्या हालचालींना वेग आला आहे.

मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्ली येथे जाऊन गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी बिष्णोईच्या हस्तांतरणासंबंधीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. या भेटीनंतर या घटनेचा तपास करणाऱ्यां अधिकाऱ्यांना बिष्णोईला ताब्यात घेण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. या सर्व घडामोडीवरून बिष्णोई लवकरच मुंबई पोलिसांच्या ताब्यात येईल, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते.

विकास प्रकल्पांना गती; 'महाराष्ट्र लँड बँक', 'महाभूमी स्टॅक' प्रणालीचे महसूलमंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण

अणुवीज प्रकल्पात ७९ हजार कोटींची गुंतवणूक

पालघर रुग्णालय हल्ला प्रकरण : पोलिसांच्या कारभारावर हायकोर्टाचे ताशेरे

अंधेरी, गोरेगावातील अतिक्रमण हटवले; अकराशे मीटर लांब फुटपाथवरील बेकायदा बांधकामांवर हातोडा; स्टॉल, बेकायदा बांधकामे, वाढीव शेड केले जमीनदोस्त

आकड्यांच्या पलीकडे तथ्याचे आकलन