मुंबई

सलमान खान गोळीबार प्रकरण : अनमोल बिश्नोईचा शरणागतीसाठी अर्ज; योग्य चौकशीची मागणी

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात असलेला गँगस्टर अनमोल बिश्नोई याने मुंबईतील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला असून योग्य चौकशी आणि न्यायाच्या हितासाठी या प्रकरणात शरणागती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Swapnil S

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात असलेला गँगस्टर अनमोल बिश्नोई याने मुंबईतील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला असून योग्य चौकशी आणि न्यायाच्या हितासाठी या प्रकरणात शरणागती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ असलेल्या अनमोल बिश्नोईला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याला अटक केली. १४ एप्रिल २०२४ रोजी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेसह अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये तो वॉन्टेड आरोपी आहे. चालू खटल्याला सामोरे जाण्यासाठी आणि न्यायालयीन कामकाजात सहभागी होण्यासाठी मी स्वेच्छेने शरणागती पत्करण्यास तयार आहे, असे त्याने स्पष्ट केले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल

विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करा; सदा सरवणकर यांच्या कन्येची आयुक्तांकडे धाव