सलमानची गॅलरी आता बुलेटप्रूफ; उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित छायाचित्र सौजन्य, एफपीजे/विजय गोहिल
मुंबई

सलमानची गॅलरी आता बुलेटप्रूफ; उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घराच्या बाल्कनीला बाहेरून बुलेट प्रूफ काचेचा संरक्षण आणि रस्त्यावर उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली बसविण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घराच्या बाल्कनीला बाहेरून बुलेट प्रूफ काचेचा संरक्षण आणि रस्त्यावर उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली बसविण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान गॅलक्सी अपार्टमेंटमधील फ्लॅटच्या बाल्कनीमधून चाहत्यांना अभिवादन करत असतो. तेव्हा सुरक्षेसाठी हे बुलेट-प्रूफ काच पॅनल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ही सुरक्षा सलमानने नियुक्त केलेल्या खासगी कंत्राटदारामार्फत करण्यात आली आहे.

२०२४ एप्रिलमध्ये कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित दोन व्यक्तींनी सलमानच्या इमारतीबाहेर मोटारसायकलवरून गोळीबार केला होता. या घटनेनंतर सलमानच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यात आली आहे.

इमारतीसमोर उच्च तंत्रज्ञान असलेला सीसीटीव्ही कॅमेरा स्थापित करण्यात आला आहे, जो कोणत्याही संशयास्पद हालचालींचा शोध घेऊ शकतो. तसेच, तिथे रेजर वायरफेन्सिंग घालण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती