मुंबई

मविआ नेत्यांचे अपघात आणि मुख्यमंत्र्यांचे जादूटोणा प्रेम; सामनातून केली टीका

प्रतिनिधी

"राज्यात मिंधे - फडणवीस यांचे खोके सरकार आल्यापासून जादूटोणा, करणी, टाचण्या, लिंबू-मिरची वगैरे अंधश्रद्धांना उभारी मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या याच विषयांची चर्चा मंत्रालयात आणि इतर सरकारी कार्यालयांमध्ये होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे ४० आमदार हे गुवाहाटीत कामाख्या देवीच्या मंदिरात गेले. तिथे त्यांनी जादूटोण्याचे विधी केले, रेडा बळी दिल्याचे म्हंटले जाते. हे बळी म्हणे मुख्यमंत्रीपदाच्या स्थैर्यासाठी दिले गेले. पुन्हा हे लोक त्याच मंदिरात नवस फेडण्यासाठी जाऊन आले. शिंद्यांचे जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले. याचा संबंध लोक सरकारपुरस्कृत जादूटोण्याशी जोडत असतील तर ते चांगले नाही" असा टोला सामनाच्या अग्रलेखातून केला गेला आहे.

यावेळी या अग्रलेखामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा अपघात, शरद पवार यांच्यासोबत घडलेला लिफ्टमधील अपघात, काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांचा अपघात, धनंजय मुंडे यांचा अपघात आणि विनायक मेटे यांचे अपघाती निधन या सर्वच संदर्भ या अग्रलेखात देण्यात आला. यामध्ये पुढे लिहिले होते की, "जादूटोणा, लिंबू-मिरची, टाचण्या, काळ्या बाहुल्या, रेडा बळी ही काही महाराष्ट्र राज्याची ओळख असता कामा नये. मात्र, सध्या तशी ती होताना दिसते. महाराष्ट्रात राजकीय विरोधकांचे जे अपघात होतायत, यामुळे त्या अघोरी विषयांच्या चर्चांना हवा मिळाली. विरोधकांच्या जीवितांचे रक्षण व्हावे यासाठी निदान उपमुख्यमंत्र्यांनी पांडुरंगास साकडे घालावे" अशी खोचक टीका करण्यात आली.

आता शेतकऱ्यांना मिळणार केवळ ५ मिनिटांत कर्ज; नाबार्ड-आरबीआय इनोव्हेशन हब यांच्यात करार

रात्री घराच्या अंगणात झोपलेल्या युवकाचा दगडाने डोके ठेचून खून, खटावमधील खळबळजनक घटना

कराड येथे तंदूर भट्टीच्या उष्णतेने ३० वर्षे जुने झाड जळाले; कारवाईची नगरपालिकेकडे मागणी

जरांगे-पाटील उतरणार विधानसभेच्या मैदानात, राज्यात २८८ जागांवर उमेदवार देणार; प्रस्थापितांना धक्के बसणार?

मुंबईत २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा; 'असा' बचाव करा