मुंबई

समृद्धी महामार्गावर अनेक गाड्यांचे टायर फुटले; सुरक्षेची काळजी न घेतल्याने कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला गेलेले तडे भरण्यासाठी ॲल्युमिनिअमचे नोजल्स फिक्स करण्यात आले होते. त्यावेळी कंत्राटदाराने या मार्गावरील वाहतूक न वळविल्याने अनेक गाड्यांचे टायर फुटल्याची घटना घडली. वाहतूक वळविण्यात न आल्याने कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला गेलेले तडे भरण्यासाठी ॲल्युमिनिअमचे नोजल्स फिक्स करण्यात आले होते. त्यावेळी कंत्राटदाराने या मार्गावरील वाहतूक न वळविल्याने अनेक गाड्यांचे टायर फुटल्याची घटना घडली. वाहतूक वळविण्यात न आल्याने कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे.

समृद्धी महामार्गावर दौलताबाद पोलीस स्टेशन हद्दीत मुंबई मार्गीकेवर पहिल्या व दुसऱ्या लेनमध्ये साधारण १५ मीटर लांबीमध्ये सूक्ष्म तडे आढळून आले होते. त्याच्या देखभाल व दुरुस्ती अंतर्गत इपॉक्सी ग्राउटिंगद्वारे सूक्ष्म तडे भरण्याचे काम करण्यात आले. तडे भरण्याचे काम करत असताना ॲल्युमिनिअमचे नोजल्स फिक्स करावे लागतात. वाहने डायव्हर्जन ओलांडून नोजल्सवरून गेल्यामुळे ३ गाड्यांचे टायर पंक्चर झाले.

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा सीपी राधाकृष्णन यांनी दिला राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे अतिरिक्त कारभार

नेपाळमध्ये अडकले ४४ नाशिककर पर्यटक; कळवण तालुक्यातील ४० तर नाशिकमधील ४ जण संकटात!

Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान मॅच रद्द करण्यास SC चा नकार, याचिकेवर तातडीने सुनावणीची मागणी फेटाळली

बॉम्बे नाही, मुंबईच! कपिल शर्माला मनसेची सक्त ताकीद; नाहीतर...

शाहरुख खान-दीपिका पदुकोण यांना मोठा दिलासा; राजस्थान उच्च न्यायालयाकडून FIR चौकशीला स्थगिती