मुंबई : स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांचे शिवाजी पार्क येथील निवासस्थान असलेल्या 'सावरकर सदन'ला वारसा स्थळाचा दर्जा देण्यास होणाऱ्या विलंबाबाबत उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने सावरकर सदनाला ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा, असे निर्देश केंद्र सरकारला दिले.
'सावरकर सदन'ला वारसा स्थळाचा दर्जा देण्यात यावा, तसेच 'जिना हाऊस'ला दिलेला वारसा स्थळाचा दर्जा रद्द करण्यात यावा आणि पर्यायी स्वरूपात अधिकृत नोंदींमध्ये 'जिना हाऊस'चे नाव 'रतनबाई हाऊस' असे ठेवण्याचे निर्देश द्यावेत, अशा विविध मागण्या याचिकेतून केल्या आहेत.
पालिकेने याचिकाकर्त्यांच्या मागणीची दखल घेत त्यांना ११ सप्टेंबर रोजी सुनावणी देण्यात आल्याची माहिती खंडपीठाला दिली. तर याचिकाकर्त्यांनी, सावरकर सदनाला राष्ट्रीय स्मारक घोषीत करण्याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.