मुंबई

माहीम किल्ल्याला नवा साज; 'सीफूड प्लाझा' झाला सुरू

पर्यटनाला चालना देण्यासाठी माहीम समुद्रकिनारी ‘सीफूड प्लाझा’ सुरू करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : पर्यटनाला चालना देण्यासाठी माहीम समुद्रकिनारी ‘सीफूड प्लाझा’ सुरू करण्यात आला आहे. याठिकाणी देशविदेशातील पर्यटकांना मासळीचा आस्वाद घेता येत असून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी १३० मीटर लांब व अडीच फूट उंच मजबूत संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. संरक्षक भिंत उभारल्यानंतर भिंतींचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच लवकरच याठिकाणी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी परवानगी प्राप्त करून कायमस्वरूपी प्रसाधनगृह आणि पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी दिली आहे. दरम्यान, पावसाळ्यात कोळी बांधवांना समुद्रात जाता यावे यासाठी बोटी ठेवण्यात येणार आहेत.

माहीम कोळीवाडा येथील समुद्र किनाऱ्याला पर्यटकांची खास पसंती असते. पर्यटनासोबत मुंबईतील कोळी वाड्यातील महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महिला बचत गटांद्वारे संचलित ‘सी फूड प्लाझा’ संकल्पना राबविण्याचे निर्देश पालिकेला दिले होते. त्यानुसार माहीम मध्ये पहिला ‘सी फूड प्लाझा’ सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी दर्जेदार अन्नपदार्थ पुरवताना व्यवसायासाठी पूरक अशी साधनसामुग्री तसेच पर्यटकांसाठी नागरी सेवा-सुविधा पुरवण्याचे निर्देश प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते.

मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

मराठवाड्यात पावसाचा कहर; धाराशिव-छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरस्थिती तीव्र, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

करूर चेंगराचेंगरी : मृतांची संख्या ३९ वर; विजय थलापतींकडून २० लाखांची मदत जाहीर, तपास समिती नियुक्तीचे आदेश

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत