मुंबई

भारतीय शेअर बाजारात विक्रीचा मारा झाल्याने सेन्सेक्स ३११ अंकांनी घसरला

राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ८२.५० अंक किंवा ०.४७ टक्का घसरुन १७,५२२.४५वर बंद झाला

वृत्तसंस्था

भारतीय शेअर बाजारात गुरुवारी विक्रीचा मारा झाल्याने प्रारंभीची तेजी संपुष्टात आली. मासिक डेरिव्हेटिव्ह समाप्तीच्या पार्श्वभूमीवर आयटी आणि बँकांच्या समभागांची जोरदार विक्री झाली. दरम्यान, भारतीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण झाली. दरम्यान, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये ७ पैशांनी घसरण झाली. बुधवारी हा दर ७९.८६ होता.

बीएसई सेन्सेक्स सकाळी सकारात्मक असताना दिवसअखेरीस अर्ध्या तासात विक्रीच्या माऱ्यामुळे ३१०.७१ अंक किंवा ०.५३ टक्का घसरुन ५८,७७४.७२वर बंद झाला. दिवसभरात तो ५९,४८४.३५ ह्या कमाल तर ५८,६६६.४२ ही किमान पातळीवर होता. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ८२.५० अंक किंवा ०.४७ टक्का घसरुन १७,५२२.४५वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत बजाज फायनान्स, इंडस‌्इंड बँक, इन्फोसिस, टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस, ॲक्सिस बँक, पॉवरग्रीड, एनटीपीसी, लार्सन ॲण्ड टुब्रो आणि एचडीएफसी यांच्या समभागात घसरण झाली. तर मारुती सुझुकी इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, डॉ. रेड्डीज आणि टायटन यांच्या समभागात वाढ झाली.

आशियाई बाजारात सेऊल, टोकियो आणि शांघायमध्ये वाढ झाली. युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत वाढ झाली होती. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.१७ टक्का वाढून १०१.३ अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरल झाले. तर विदेशी गुंतवणूक संस्थांनी बुदवारी २३.१९ कोटींच्या समभागांची खरेदी केली.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक