मुंबई

सेन्सेक्सचा आकडा घसरला,गुंतवणूकदारांचे कोटीचे नुकसान

शेअर बीएसई सेन्सेक्स शुक्रवारी सकाळी घसरणीने उघहला आणि दिवसभर घसरणीचा कल कायम राहिला

वृत्तसंस्था

वाढती महागाई आणि कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याने जागतिक बाजारात विक्रीचा मारा झाला. हाच कल देशांतर्गत बाजारात राहिल्याने गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा झाला. त्यामुळे सेन्सेक्स १ हजार अंकांनी कोसळला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांकडून पैसे काढून घेण्याचा सपाटा सुरु राहिल्याने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने नवा नीचांकी तळ गाठला.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स शुक्रवारी सकाळी घसरणीने उघहला आणि दिवसभर घसरणीचा कल कायम राहिला. दिवसअखेर सेन्सेक्स १,०१६.८४ अंकांनी किंवा १.८४ टक्क्यांनी घटून ५४,३०३.४४ वर बंद झाला. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी २७६.३० अंक किंवा १.६८ टक्के घसरुन १६,२०१.८० वर बंद झाला.

शुक्रवारच्या सत्रात गुंतवणूकदारांचे ३.११ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. बीएसईतील नोंदणीकृत कंपन्यांचे बाजारमूल्य २,५१,८४,३५८.८६ कोटींनी घसरले. सेन्सेक्सवर्गवारीत कोटक महिंद्रा बँकेचा समभाग सर्वाधिक ३.९६ टक्के घसरला तर त्यापाठोपाठ बजाज फायनान्स, एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि टाटा स्टील आदींचा समभाग घसरला. तर एशियन पेंटस‌्, डॉ. रेड्डीज, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर लि., टायटन, मारुती, नेस्ले इंडिया आणि एनटीपीसी आदी कंपन्यांच्या समभागात ०.७८ टक्क्यानी वाढ झाली.

सप्ताहाचा आढावा घेतला असता सेन्सेक्स १४६५.७९ अंक किंवा २.६३ टक्के घसरला. तर निफ्टी ३८२.५० अंक किंवा २.३१ टक्के घसरण झाली.

अमेरिकेतील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन फेडरल रिझर्व्हची पुढील आठवड्यात बैठक होत आहे. १४ जूनच्या सायंकाळी व्याजदरात किती वाढ होईल, हे जाहीर होईल. त्यामुळे वाढती महागाई आणि व्याजदरात वाढ होण्याच्या भीतीने देशांतर्गत बाजारात गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केला. युरोपियन सेंट्रल बँकेच्या पतधोरण बैठकीत पुढील महिन्यापासून व्याजदरात वाढ होण्याचे संकेत दिले आहेत. विदेशी गुंतवणूक संस्थांकडून काढून घेण्यात येत असलेला निधी, व्यापार तूटीत होत असलेली वाढ, कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ यामुळे गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा मारा करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ०.४५ टक्का वधारुन प्रति बॅरलचा दर १२३.६२ अमेरिकन डॉलर झाला. तेलाचे दर १२१ अमेरिकन डॉलर प्रति बॅरलवर गेल्यानंतरही भारतातील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.

आजचे राशिभविष्य, ३१ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

३१ डिसेंबरचं सेलिब्रेशन घरी करताय? रात्रीच्या जेवणात करा काहीतरी स्पेशल; 'ही' घ्या मेन्यू लिस्ट

BMC Election 2026 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर ; एकूण ९४ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात, वाचा सर्व उमेदवारांची नावे

BMC Election 2026 : शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले; कोणत्या प्रभागात कोणाला संधी?

आधी लाथा-बुक्क्या, आता जादू की झप्पी; व्हायरल झालेल्या 'त्या' डॉक्टर आणि पेशंटचं भांडण मिटलं, नेमकं प्रकरण काय?