मुंबई

सेन्सेक्स २८७ अंकांनी घसरला;आशियाई बाजारातील घसरणीचा मोठा परिणाम

सेन्सेक्स ५९४८९.०२ पर्यंत घसरला, तर ६००८१.२४ पर्यंत वधारला, तर निफ्टी ७४.४० अंकांनी घसरून १७६५६ वर बंद झाला.

प्रतिनिधी

गेल्या सात दिवसांपासून मुंबई शेअर बाजारात सुरू असलेली तेजी मंगळवारी संपली. आशियाई बाजार नरम पडल्याने आणि युरोपियन बाजारातून संमिश्र स्वरूपाचे संकेत मिळाल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २८७.७० अंकांनी घसरून ५९५४३.९६ वर बंद झाला.

दिवसभरात सेन्सेक्स ५९४८९.०२ पर्यंत घसरला, तर ६००८१.२४ पर्यंत वधारला, तर निफ्टी ७४.४० अंकांनी घसरून १७६५६ वर बंद झाला.

नेस्ले इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, एशियन पेंट‌्स‌ आदींचे समभाग घसरले, तर टेक महिंद्रा, मारुती, लार्सन ॲँड टुब्रो, डॉ. रेड्डीज लॅब, एसबीआय, एनटीपीसी आदींचे समभाग वधारले.

आशियातील सेऊल, शांघाय व हाँगकाँग आदीचे बाजार घसरले, तर टोकियो बाजार वधारला. युरोपियन स्टॉक एक्स्चेंजमध्ये बाजार संमिश्र होते. तर अमेरिकेतील वॉल स्ट्रीट बाजार सोमवारी वधारला.

रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले की, जागतिक बाजारातून अजूनही स्पष्ट संदेश मिळत नाहीत. विविध क्षेत्रातील समभाग निवडीवर केंद्रीत करायला हवे. ते करताना जोखमी व्यवस्थापन करायला हवे.

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणशले की, दैनंदिन उत्पादन बनवणाऱ्या कंपन्या व खासगी बँकांच्या समभागात घसरण झाली. युरोपियन मध्यवर्ती बँकेची बैठक लवकरच होणार आहे. यात पुन्हा व्याजदर वाढीची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बाजाराचे पूर्ण लक्ष या बँकेच्या घोषणेवर लागले आहे.

दिवसभरात बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक ०.३५ टक्के घसरला, तर मिडकॅप ०.४५ टक्के वधारला. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव १.२७ टक्क्याने घसरून ते ९२.०८ डॉलर्स प्रति पिंप झाले. सोमवारी परदेशी वित्त गुंतवणूकदारांनी १५३.८९ कोटींचे समभाग विकले.

शेअर बाजार दिवाळी बलिप्रतिपदेनिमित्त बुधवारी बंद राहणार आहे.

२४ तासांत आंदोलकांना हटवा! मुंबई उच्च न्यायालयाचा जरांगे यांना अल्टिमेटम; आझाद मैदानात फक्त पाच हजार आंदोलकांना परवानगी

सुहाना खानच्या अडचणी वाढणार? शेतजमीन खरेदीवर वाद; अटींचा भंग केल्याचा आरोप; महसूल विभागाकडून चौकशी सुरू

Maratha Reservation : आंदोलनाला ‘खेळकर’ रंग; आंदोलकांचे मुंबईत क्रिकेट, कबड्डी, खो-खो

पुण्याहून आझाद मैदानाकडे निघालेल्या मराठा बांधवांवर पनवेलमध्ये किरकोळ कारणावरून हल्ला; ५ जण जखमी, दोघांना अटक

मत चोरीच्या अणुबॉम्बनंतर आता हायड्रोजन बॉम्ब येणार; मोदींना चेहरा लपविण्यासाठीही जागा मिळणार नाही; राहुल गांधींचा मोठा इशारा