शरद पवार पुन्हा ब्रीच कँडीत दाखल; महिनाभरात तिसऱ्यांदा रुग्णालयात जाण्याची वेळ; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली काळजी, म्हणाल्या- 'बाबा ऐकत नाहीत...' संग्रहित छायाचित्र
मुंबई

शरद पवार पुन्हा ब्रीच कँडीत दाखल; महिनाभरात तिसऱ्यांदा रुग्णालयात जाण्याची वेळ; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली काळजी, म्हणाल्या- 'बाबा ऐकत नाहीत...'

शरद पवार यांना निर्जलीकरणाच्या त्रासामुळे पुन्हा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महिनाभरात तिसऱ्यांदा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी 'बाबा ऐकत नाहीत...' म्हणत व्यक्त केली काळजी.

Mayuri Gawade

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या महिनाभरात त्यांना तिसऱ्यांदा रुग्णालयात जाण्याची वेळ आली आहे. यावेळी निर्जलीकरणाचा (डिहायड्रेशन) त्रास झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (दि. २६) सोशल मीडियावर पोस्ट करत वडिलांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. डॉक्टरांनी प्रवास कमी करून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असतानाही शरद पवार कामातून विश्रांती घेत नसल्याचं सांगत त्यांनी काळजी व्यक्त केली. मात्र, पवार यांची प्रकृती ठीक असल्याचंही सुळे यांनी स्पष्ट केलं आहे.

'बाबा ऐकत नाहीत...'

सुप्रिया सुळे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं, "डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने बाबांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना प्रवास कमी करण्याचा तसेच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण बाबा ऐकत नाहीत. त्यांना कामात रमून जायला आवडते."

पवार यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करणाऱ्यांचे आभार मानताना सुळे यांनी पुढे म्हटलं, "बाबांची तब्येत ठीक आहे. आपण सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार."

महिनाभरात तिसऱ्यांदा रुग्णालयात

शरद पवार यांना यापूर्वी २ नोव्हेंबर रोजी खोकला आणि छातीत दुखण्याचा त्रास जाणवला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना नियोजित ग्रामीण भागातील दौरा अर्धवट सोडावा लागला होता.

त्यानंतर मुंबईत परतल्यावर ४ नोव्हेंबर रोजी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी छातीत संसर्ग झाल्याची माहिती रुग्णालयातील डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली होती. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. पुढील उपचार घरीच सुरू ठेवण्याबरोबरच पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्लाही देण्यात आला होता.

आता २६ नोव्हेंबर रोजी निर्जलीकरणाच्या त्रासामुळे शरद पवार यांना पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महिनाभरात तिसऱ्यांदा रुग्णालयात दाखल झाल्याने त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त होत असली, तरी त्यांची तब्येत ठीक असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : परळ स्थानकातील पादचारी पुलाचा जिना तोडणार; प्रस्तावित पाचव्या, सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी मोडतोड

कसारा-CSMT लोकलमध्ये थरार; बिडी ओढण्यास विरोध करताच प्रवाशावर धारदार शस्त्राने हल्ला, तिघे फरार

Mumbai : कचरा हटविण्याचे आव्हान; केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून झाडाझडती, कचऱ्यापासून ऊर्जानिमिर्ती प्रकल्प राबवा

झाडे लावून मुंबईची हवा शुद्ध होणार नाही, बसेस वाढवा; प्रवीणसिंह परदेशी यांचा महापौरांना सल्ला

मुंबईतील बंद हायड्रंटचे ऑडिट करा; दिक्षा कारकर यांचे आयुक्तांना पत्र